Sandipan Bhumre News : '...त्यामुळे मी खासदार होणारच' ; संदीपान भुमेरेंचा विश्वास!

Chhatrapati Sambhajinagar Constituency : 'चंद्रकांत खैरे आणि मला एकाच व्यासपीठावर आणा अन्...' असं जाहीर आव्हानही केलं आहे.
Sandipan Bhumre
Sandipan BhumreSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : 'मी शब्द पाळणार माणूस आहे, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून इथे औद्योगिक, पर्यटन, शैक्षणिक व सर्वच स्तरावर विकास करण्याचा मी प्रयत्न केला आहे. संत एकनाथ महाजांच्या पैठण भूमीतून मी आलो आहे. संत-महंत आणि वारकऱ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे मी छत्रपती संभाजीनगरचा खासदार होणारच.', असा विश्वास महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी व्यक्त केला.

शहरातील लोकांना आठ-आठ दिवस प्यायला पाणी मिळत नाही, त्यांना दररोज पाणी देण्याच्या कामाला माझे प्राधान्य असेल, अशी ग्वाही भुमरे(Sandipan Bhumre) यांनी दिली. या आधीच्या खासदाराने शहराचे आणि जिल्ह्याचेही वाटोळं केलं. ती चूक सुधारण्याची वेळ आणि संधी मला महायुतीने लोकसभेची उमेदवारी देऊन दिली आहे. मी निवडून आल्यानंतर या संधीच सोनं केल्याशिवाय राहणार नाही. शहराच्या पाणीपुरवठा योजनेला गती देण्याचा प्रयत्न सुरु आहे. असंही ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sandipan Bhumre
Lok Sabha Election 2024 : ओवेसी संभाजीनगरात येणार; इम्तियाज जलील यांच्या विजयासाठी जंग जंग पछाडणार!

याशिवाय 'अंतर्गत पाणीपुरवठा योजना पन्नास वर्षे जुनी असल्याने ठिकठिकाणी गळती लागली आहे. शासनाने या गळतीसाठी दोनशे कोटी रुपये दिले आहेत. ही योजना 2700 कोटी रुपयांत पूर्ण होईल. सध्या महानगरपालिकेची आर्थिक स्थिती पाहता त्यांच्या वाट्याचे साडेआठशे कोटींचा वाटा शासनाने उचलावा, यासाठी आम्ही प्रयत्न केले. येत्या काळात शहराला चोवीस तास पाणी पुरवठा होईल, अशी ग्वाही देतो.' असंही भुमरे म्हणाले.

याचबरोबर 'महायुती सरकारचा पालकमंत्री म्हणून शहर सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. नेहमीच धर्म आणि समाजासाठी मी चांगले काम करत आलो आहे. डीएमआयसी प्रकल्पामध्ये नवनवीन उद्योग येण्याबाबत उद्योगमंत्र्यांशी बोलणे झाले आहे. पर्यटन नगरी म्हणून जिल्ह्याचा विकास करण्यासाठी टूर ऑपरेटर परिषद भरवली. पर्यटन वाढल्यास शहरातील उद्योग वाढतील, शहरात आयपीएल सारखे क्रिकेट सामने भरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडीयम बनवण्याचा प्रयत्न सुरु आहेत.'

Sandipan Bhumre
Dharashiv Loksabha Constituency : राहुल गांधी पंतप्रधान होणारच नाहीत, मग विरोधकांचा खासदार कशाला? जानकरांनी वाजवली शिट्टी!

'मी शब्द पाळणारा व्यक्ती आहे, ब्रह्मगव्हाण योजनेतून पाणी दिले, पैठणला सगळे रस्ते जोडण्याचे काम केले. मी नाथांच्या भूमीतून आलो आहे, येथील भक्त निवास असो की वारकरी संस्था, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. संत, महंत आणि वारकऱ्यांच्या आशीर्वादामुळे मी छत्रपती संभाजीनर लोकसभा मतदारसंघात भरघोस मतांनी विजयी होईल.', याचा पुनरुच्चार भुमरे यांनी केला.

विरोधक विकासाच्या मुद्यावर बोलू शकत नाहीत..-

'शहराचा पालकमंत्री असलो तरी माझ्याकडे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन खाते आहे. या खात्याच्या माध्यमातून मी ग्रामीण भागात गाय गोठे, मनरेगाच्या विहिरी, शेततळे, ठीक ठिकाणी पेवर ब्लॉक, सिमेंट काँक्रीटचे रस्ते आदी विकास कामे केली. त्यामुळे विरोधकांकडे माझ्याविरोधात मुद्दे नाहीत. चंद्रकांत खैरे आणि मला एकाच व्यासपीठावर आणा अन् जनतेला प्रश्न विचारायला सांगा. ते विकासाच्या मुद्द्यावर बोलू शकत नाही.'

कारण त्यांनी आपल्या वीस वर्षाच्या कार्यकाळात फक्त जातीपातीच राजकारण केले. कोणत्याही प्रकारे विकासाला वाव दिला नाही. विरोधकांकडे सध्या प्रचारासाठी विकासाचे मुद्दे नाहीत म्हणून ते वैयक्तिक पातळीवर टीका करत असल्याचे भूमरे म्हणाले. माझ्या 35 वर्षाच्या कार्यकाळात लोकसभेच्या निवडणुकीत एवढा प्रतिसाद पाहिला नव्हता, असा दावा करत भुमरे यांनी विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com