Parbhani Politics News :निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटनांचा सपाटा अन् श्रेय लाटण्यासाठी स्पर्धा...

Loksabha Election 2024 : महाविकास आघाडी आणि महायुतीमधील अंतर्गत विसंवादही उघड...
Mahayuti Dispute News :
Mahayuti Dispute News :Sarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : अपयश हे अनाथ असते तर यशाचे श्रेय घेण्यास प्रत्येकजण इच्छुक असतो. विशेषतः राजकीय क्षेत्रात तर ही बाब प्रकर्षाने जाणवते. काम करण्यापेक्षा झालेल्या कामाचे श्रेय मिळवण्याची कला आत्मसात करणे ही सध्याच्या राजकीय क्षेत्रात आवश्यक पात्रता बनली आहे. परभणीतील राजकीय क्षेत्रात सध्या असेच चित्र आहे. परभणी शहरातील अंतर्गत रस्त्यासाठी महाविकास आघाडीच्या काळात निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, राज्यात सत्तांतर झाले आणि महायुती सरकारने महाविकास आघाडीच्या सर्व कामांना स्थगिती दिली.

शासनाच्या या निर्णयाविरोधात परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने या योजनेचा निधी राखीव ठेवण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या परभणी दौऱ्यात ही मागणी प्रकर्षाने समोर आली. त्यास प्रतिसाद देत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

Mahayuti Dispute News :
Shivsena News : शिवसेनेची घोषणाबाजी, ठाकरे गटाचा संयम तरीही शाब्दिक चकमक

शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान(Saeed Khan) यांच्या नेतृत्वात परभणी शहरातील कॉंग्रेस नेते माजुलाला यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्याकडे परभणीच्या रस्त्यांसंदर्भात कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. आमदार डॉ.राहुल पाटील यांनी नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचे आंदोलन केले. अखेर यासंदर्भात शासनाने निर्णय निर्गमित केला आणि परभणीकरांची मोठी मागणी पूर्ण झाली. मात्र या कामाचे श्रेय घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षात अक्षरशः चढाओढ लागली.

काँग्रेसचे (Congress) जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपूडकर यांनी 17 रोजी पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमाना माहिती दिली. तर दुसऱ्याच दिवशी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनीही पत्रकार परिषद घेत भाजपच्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचा दावा केला. मग शिवसेना (शिंदेगट) नेते माजुलाला यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा संदर्भ दिला व आपल्या मागणीला यश आल्याचे सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मग आमदार राहुल पाटील यांनी प्रसिद्धी पत्रक काढत मागणीला यश आल्याचा दावा केला व तसेच यशाचे श्रेय घेणारे परभणीकरांना झालेल्या त्रासाचीही जबाबदारी घेणार का? असा टोलाही विरोधकांना लगावला. यानिमित्ताने महाविकास आघाडी आणि महायुतीमधील अंतर्गत विसंवादही उघडपणे दिसून आला.

वरपूडकर यांच्या पत्रकार परिषदेला शिवसेना (ठाकरे गट) आमदार डॉ.राहुल पाटील यांना टाळण्यात आल्याने महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्येही खटके उडत असल्याचे दिसून आले. तर भाजप आणि शिवसेना(Shivsena) (शिंदे गट) नेते माजुलाला यांनी स्वतंत्रपणे पत्रकार परिषदा घेतल्याने महायुतीमध्येही अशीच स्थिती असल्याचे दिसले.


(Edited By Deepak Kulkarni)

Mahayuti Dispute News :
Pune Police Biryani Case : पोलिस उपायुक्तांना फुकट बिर्याणी; कर्मचाऱ्यावर मात्र कारवाई; काय आहे प्रकरण ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com