Shivsena News : शिवसेनेची घोषणाबाजी, ठाकरे गटाचा संयम तरीही शाब्दिक चकमक

Nashik Lok Sabha Constituency : नाशिकच्या गंगाघाटावर दोन्ही शिवसेनेचे पदाधिकारी समोरासमोर, पोलिसांकडून शिवसेना पदाधिकाऱ्यांना समज...
Eknath Shinde, Uddhav Thackeray
Eknath Shinde, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nashik Political News :

आमदार अपात्रता निकालानंतर दोन्ही शिवसेना एकमेकांवर खार खाऊन असतात. त्याची प्रचिती काल नाशिकमध्ये आली. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) पदाधिकारी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या युवा सेनेचे कार्यकर्ते गंगाघाटावर आमनेसामने आले आणि त्यानंतर मोठा तणाव निर्माण झाला.

शिवसेनेसह युवासेना पदाधिकाऱ्यांचा गंगा घाटावर पाहणी दौरा होता. यात पालकमंत्री दादा भुसे उपस्थित राहणार असल्याने हे पदाधिकारी त्यांची वाट पाहत थांबले होते. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विनायक राऊत, युवासेनेचे वरुण सरदेसाई आणि पदाधिकारी गंगाघाटावर पोहोचले.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 22 जानेवारीला नाशिक दौऱ्यावर असून, त्यावेळी त्यांच्या हस्ते राम आरती आणि गोदापूजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर या परिसराची पाहणी करण्यासाठी हे शिष्टमंडळ आले होते.

Eknath Shinde, Uddhav Thackeray
Shivsena News : नाशिकमध्ये भाजप 'ना घर का, ना घाट का'

अचानक दोन्ही शिवसेना समोरा-समोर आल्यानंतर शिवसेनेकडून 'नाशिकची जागा शिवसेनेची, एकनाथ शिंदे आगे बढो' अशा घोषणा सुरू झाल्या. त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला. मात्र ठाकरेंच्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी संयम दाखवत तेथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. तरीही शाब्दिक चकमक उडलीच. पोलिसांनी मध्यस्थी करत घोषणाबाजी करणाऱ्यांना समज देत वादावर पडदा पाडला.

एकेकाळी एकत्र असलेले आताचे कट्टर विरोधक बनल्याचे गंगाघाटावर पाहायला मिळाले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू करताच विनायक राऊत, वरुण सरदेसाई आणि इतर पदाधिकाऱ्यांनी प्रत्युत्तर न देता घटनास्थळावरून जाण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान ठाकरे गटाचे दीपक दातीर आणि शिवसेना तसेच युवासेना पदाधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक उडालीच. त्यावर शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी त्यांच्यावर धावून गेले. अखेर ठाकरे गटाने पोलिसाकडे फोनवरुन तक्रार केली. त्यानंतर पंचवटी पोलिस स्टेशनकडून शिवसेना आणि युवासेना पदाधिकारी नाशिक लोकसभा संघटक योगेश म्हस्के, युवासेना विस्तारक योगेश बेलदर, युवासेना महानगरप्रमुख दिगंबर नाडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल सूर्यवंशी चौकशीसाठी बोलावण्यात येऊन समज देण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोन्ही गटाच्या हालचाली वाढल्यात

उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या तयारीसाठी ठाकरेंच्या युवासेनेचा मेळावा पाथर्डी फाटा भागात झाला. तर, शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) युवासेनेने मेळाव्यातून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. शहरात आता दोन्ही गट चांगलेच सक्रिय झाले असून, गंगाघाटावर झालेल्या घोषणाबाजीचे भविष्यात पडसाद उमटू शकतात.

(Edited by Avinash Chandane)

Eknath Shinde, Uddhav Thackeray
Shiv Sena MLA Disqualification : ठाकरेंचे आमदार अपात्र करण्याच्या याचिकेवर कोर्टाचे आदेश; 'अध्यक्षांनी भूमिका...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com