Parbhani Ncp News: पक्ष,चिन्ह मिळताच राष्ट्रवादीत 'इनकमिंग' सुसाट; सेलूच्या माजी नगराध्यक्षाचा प्रवेश

NCP Political News : विनोद बोराडे यांनी कॉंग्रेस पक्ष तसेच नगरविकास आघाडीच्या माध्यमातून नगर परिषदेवर अनेक वर्ष सत्ता केली.
Parbhani Ncp News
Parbhani Ncp NewsSarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : राज्यातील राजकीय नेत्यांना लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असून प्रत्येक नेता स्वत:चे स्थान बळकट करण्याच्या प्रयत्नात आहे.विशेषतः सत्ताधारी पक्षाकडे इनकमिंगचे सत्र सुरु झाले आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि निवडणुक चिन्ह घड्याळ अजित पवार गटाला बहाल केल्यानंतर हे प्रमाण वाढले आहे. सेलुचे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

बोराडे यांच्या प्रवेशाने जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाची ताकद वाढणार असली तरी शरद पवार गटाचे नेते माजी आमदार विजय भांबळे यांची अडचण होणार असल्याचे मानले जात आहे. जिंतूर विधानसभा मतदारसंघात जिंतूर व सेलू या तालुक्यांच्या समावेश होतो. विनोद बोराडे यांनी कॉंग्रेस पक्ष तसेच नगरविकास आघाडीच्या माध्यमातून नगर परिषदेवर अनेक वर्ष सत्ता केली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान बोराडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

Parbhani Ncp News
CM Eknath Shinde News: अडीच वर्षांत माडीवरून खाली नाही उतरले, दाढीपर्यंत..? शिंदेंचा ठाकरेंवर खोचक पलटवार

देशात नागरिकत्वाच्या कायद्या (सीएए) विरोधात आंदोलन सुरु होते. यादरम्यान, अनेक नगर परिषदेमध्ये सीएए विरोधात ठराव मंजूर करण्यात येत होते.भाजपचे सरकार असताना भाजपमध्ये असलेल्या बोराडे यांनी सीएए विरोधात ठराव घेतल्याने पक्षाने बोराडे यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली होती.त्यानंतर बोराडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

पक्षाचे जिल्हाध्यक्ष व परभणी, हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी हा प्रवेश घडवून आणला. जिंतूर विधानसभा मतदारसंघात सेलू तालुक्याचा समावेश होतो. विनोद बोराडे यांचा सेलू शहर व तालुक्यामध्ये प्रभाव आहे. जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजय भांबळे हे अजित पवार यांचे समर्थक मानले जातात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवार यांनी भाजप- शिवसेना (Shivsena) यांच्या सहभाग असलेल्या महायुतीमध्ये प्रवेश केला. स्थानिक राजकीय गणितामुळे भांबळे यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याऐवजी शरद पवार यांची साथ देण्याचे ठरवले. बोराडे यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने जिंतूर मतदारसंघात महायुतीची ताकद वाढली आहे. यासाठी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पुढाकार घेतला. विनोद बोराडे राष्ट्रवादी शरद पवार गटात गेले असते तर त्यामुळे जिंतूर मतदारसंघात विजय भांबळे यांची ताकद वाढली असती.

(Edited By Deepak Kulkarni)

Parbhani Ncp News
Shambhuraj Desai On Thackeray : आजही आम्ही ठाकरेंचा आदरच करतो; शिंदेंच्या मंत्र्यांचं 'मातोश्री'प्रेम!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com