BJP Political News : भाजपमध्येही इनकमिंग सुरू, महापालिका स्वबळावर लढण्यावर ठाम!

Incomings are also starting in BJP, Sambhajinagar Municipal Corporation is determined to fight on its own : शिंदेसेनेला लगाम घालण्यासाठीच भाजपने महापालिकेसाठी स्वबळाची तयारी चालवली आहे. शिंदेसेनेकडून युतीचा प्रस्ताव दिला जाणार असला, तरी भाजप स्वतंत्रपणे लढण्यावर ठाम असल्याचे दिसते.
Chhatrapati Sambhajinagar BJP News
Chhatrapati Sambhajinagar BJP NewsSarkarnama
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेना आणि त्यापाठोपाठ (BJP) भाजपमध्ये इनकमिंग सुरु झाले आहे. काही दिवसांपुर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी महापौर नंदकुमार घोडेले, अनिता घोडेले यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. घोडेले यांना भाजपमध्ये घेण्याचे प्रयत्न सुरू होते, परंतु घोडेले यांनी शिवसेनेलाच पसंती दर्शवली होती. आणखीही दहा ते बारा नगरसेवक उद्धवसेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत.

एकीकडे शिंदेसेनेची ताकद शहरात वाढत असतांना भाजपच्या गोटात मात्र काहीसी शांतता होती. पण भाजपनेही आता हातपाय मारायला सुरुवात केली आहे. (Chhatrapati Sambhajinagar) दोन माजी नगरसेवक त्यांच्या गळाला लागले असून माजी नगरसेवक कैलास गायकवाड तसेच रमेश जायभाये यांनी भाजपा पक्षात प्रवेश केला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी मुंबईत जाऊन भेट घेतली. भाजपा नेतृत्वावर, विचारसरणीवर व आपल्या कार्यशैलीवर विश्वास ठेऊन त्यांचा झालेला पक्षप्रवेश निश्चितच संघटनात्मक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

Chhatrapati Sambhajinagar BJP News
BJP Politics: एकनाथ शिंदे यांच्या नाशिकच्या लाडक्या आयुक्तांवर भाजपची वक्रदृष्टी?

यावेळी माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉ.भागवत कराड, मंत्री अतुल सावे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, माजी महापौर बापू घडामोडे आदींची उपस्थिती होती. नुकत्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील नऊ पैकी सहा जागा जिंकत एकनाथ शिंदे यांची शिवसेना मोठा भाऊ ठरली आहे. तर भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या आहेत. त्याआधी लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरमध्ये भाजपने जोरदार तयारी केली असताना ही जागा शिवसेनेला सोडावी लागली.

Chhatrapati Sambhajinagar BJP News
Municipal Corporation Election: महापालिका स्वबळावर लढण्याची खुमखुमी! पण एमआयएमची भितीही..

संदीपान भुमरे यांना निवडून आणण्यासाठी भाजपला आपली संघटनात्मक ताकद लावावी लागली होती. भुमरे लोकसभेव निवडून गेल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भाजपकडे येईल, अशी अपेक्षा होती. तशी मागणीही स्थानिक भाजपच्या नेते पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. परंतु त्यास त्यांनी नकार देत शिवसेनेकडेच जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले.

Chhatrapati Sambhajinagar BJP News
Uddhav Thackeray Shivsena : ...तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा 'अच्छे दिन' येऊ शकतात!

जिल्ह्यात भाजपचे बळ वाढलेले असतांना त्यांना बॅकसीटवर बसावे लागत असल्याने पक्षामध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुक स्बळावर लढवून छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपचा महापौर बसवायचा, असे फर्मानच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक नेत्यांनी दिल्याची माहिती आहे. शिंदेंची शिवसेना जिल्ह्यात अधिक मजबूत होत असतांना भाजपला आता धोक्याची घंटा दिसू लागली आहे. शिंदेसेनेला लगाम घालण्यासाठीच भाजपने महापालिकेसाठी स्वबळाची तयारी चालवली आहे.

Chhatrapati Sambhajinagar BJP News
Maharashtra BJP : पद, निवडणुकीत उमेदवारी पाहिजे तर सदस्य नोंदणी वाढवा; भाजपचा फंडा!

शिंदेसेनेकडून युतीचा प्रस्ताव दिला जाणार असला, तरी भाजप स्वतंत्रपणे लढण्यावर ठाम असल्याचे दिसते. भाजपचा हा काॅन्फिडंस आहे की ओव्हर काॅन्फिडंस? हे लवकरच स्पष्ट होईल. येत्या मार्चमध्ये महापालिका निवडणुका होण्याची शक्यता लक्षात घेत सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यात सत्ताधारी शिवसेना आणि भाजपकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेवकांचा ओढा दिसतो. भाजपमध्ये इनकमिंगला सुरूवात झाली आहे, अजून त्यांच्या गळाला काही मोठे मासे लागतात का? यावर युती की स्वबळ? याचा फेरविचार होऊ शकतो, असे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com