Indurikar Maharaj News : इंदुरीकर महाराज अडचणीत; औरंगाबाद खंडपीठाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश!

Crime Filed Against Indurikar Maharaj : लिंगभेदावरील विधान चांगलंच भोवलं...
Crime File Against Indurikar Maharaj :
Crime File Against Indurikar Maharaj : Sarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News : किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj News) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाकडून दिले आहेत. जिल्हा सत्र न्यायालयाने इंदोरीकर महाराजांना दिलासा दिला होता. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राज्य सरकारने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्यानुसार आता इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल होणार आहे. (Latest Marathi News)

Crime File Against Indurikar Maharaj :
Sanjay Raut Slams Eknath Shinde : 'फेविकॉल का जोड' दोन महिन्यात तुटेल ; बेडकानं हत्तीशी तुलना करू नये ; राऊतांनी..

काही दिवसांपूर्वी इंदोरीकर महाराज यांनी लिंगभेदाबाबत वक्तव्य केलं होतं. सम आणि विषम तारखेला स्त्री-पुरूष संबंध आले तर, यामुळे मुलगा किंवा मुलीचा जन्म कसा होतो, अशा आशयाचं वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी केले होते. यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण सत्र न्यायालयात सुरू होतं. सत्र न्यायालयात इंदुरीकर महाराज यांच्या विरूद्धचा गुन्हा रद्द करण्यात आला होता.

Crime File Against Indurikar Maharaj :
Deepak Kesarkar On Ajit Pawar : अजितदादांनी आमच्या सरकारमध्ये यावं; मंत्री केसरकरांची दादांना खुली ऑफर!

इंदुरीकर महाराज यांच्या विरूद्धचा गुन्हा रद्द करण्यात आल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि शासनाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्यानुसार औरंगाबाद खंडपीठाने निकाल दिलेला आहे. इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्याबाबत गुन्हा दाखल करा, असे आदेश खंडपीठाने दिले आहे. (Crime File Against Indurikar Maharaj)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com