Ausa Political News : ‘एक फडणवीसांचा लाडका, एक अजितदादांचा विश्वासू… औशात सत्तासंघर्ष पेटला!’

Political News : औसा नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप आमदार अभिमन्यू पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अफसर शेख यांच्या पॅनलमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली.
Abhiamanyu pawar, Afsar shaikh
Abhiamanyu pawar, Afsar shaikh Sarkarnama
Published on
Updated on

जलील पठाण

Ausa municipal corporation election : राज्याच्या सत्तेत एकत्र मांडीला मांडी लावून बसलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस औसा तालुक्यात मात्र समोरासमोर उभे ठाकले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या औसा नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप आमदार अभिमन्यू पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अफसर शेख यांच्या पॅनलमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली. निकाल 21 तारखेला लागणार असले, तरी या निवडणुकीने पुढील राजकीय रणसंग्राम कसा होईल ? याचा अंदाज येत आहे.

नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेले आरोप-प्रत्यारोप डॉ. अफसर शेख यांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहेत. अजित पवारांचे विश्वासू आणि ‘गबरू’ म्हणून ओळख असलेल्या डॉ. शेख यांनी आता थेट फडणवीसांचे लाडके आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांना पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या मैदानात आव्हान दिले आहे. ग्रामीण भागात त्यांनी भेटीगाठी सुरू करत भाजपला ‘पाणी पाजण्याचा’ निर्धार केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Abhiamanyu pawar, Afsar shaikh
BJP Candidate List : पुण्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, भाजपची उमेदवार यादी फायनल; इच्छुकांनी देव ठेवले पाण्यात!

आतापर्यंत नगरपालिका राजकारणापुरतेच मर्यादित राहिलेले डॉ. अफसर शेख पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांपासून दूर होते. मात्र, नगर परिषदेच्या निवडणुकीत आमदार पवारांनी राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी केलेली कोंडी आणि आक्रमक रणनीतीमुळे शेख पेटून उठल्याचे चित्र आहे.

Abhiamanyu pawar, Afsar shaikh
Shivsena-BJP News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत मोठा भाऊ कोण? शिवसेना-भाजप युतीत जागा वाटप ठरणार कळीचा मुद्दा?

राजकीय समीकरणे पाहिली, तर एकीकडे अजित पवारांचे खास मानले जाणारे डॉ. अफसर शेख, तर दुसरीकडे ‘शॅडो सीएम’ अशी ओळख असलेले भाजप आमदार अभिमन्यू पवार. एक उपमुख्यमंत्र्यांचा विश्वासू, तर दुसरा मुख्यमंत्र्यांचा लाडका. या दोघांच्या प्रयत्नांतून औशाच्या विकासासाठी मोठा निधी मिळाला असला, तरी सत्तेच्या वाटपावरून ठिणगी उडाल्याचे स्पष्ट झाले.

Abhiamanyu pawar, Afsar shaikh
Congress leader : "काँग्रेसला 'झिरो' करण्याचा विडा! अशोक चव्हाणांनी थेट 'हुकमी एक्का'च फोडला; भाजपच्या खेळीने राजकीय वर्तुळात खळबळ."

नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून मुस्लिम मतदार फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. 23 पैकी सात मुस्लिम उमेदवार देत भाजपने (BJP) वेगळी रणनीती आखली. त्याला उत्तर म्हणून डॉ. शेख यांनी हिंदू मतदारांमध्ये आपली पकड मजबूत करत भाजपला जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. या संघर्षात आमदार पवार आणि त्यांच्या टीमकडून झालेली टीका शेख यांच्या जिव्हारी लागली, हे आता उघड झाले आहे.

Abhiamanyu pawar, Afsar shaikh
NCP Politics : महापालिकेपूर्वीच महायुतीत तणाव? दादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळावर नारा

डॉ. अफसर शेख यांना नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता येणार याचा ठाम विश्वास आहे. मात्र एवढ्यावर न थांबता, आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत भाजपला धक्का देण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. शहरापुरते मर्यादित न राहता ग्रामीण भागात सक्रिय होत, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपला भिडण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.

Abhiamanyu pawar, Afsar shaikh
BJP PUNE: उमेदवारीसाठी देव पाण्यात ठेवणाऱ्या भाजपच्या माजी नगरसेवकांना बसणार शॉक; नव्या चेहऱ्यांना संधी?

नगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्याचे दावे दोन्ही बाजूंनी केले जात असले, तरी खरे चित्र रविवारी स्पष्ट होणार आहे. मात्र एक गोष्ट नक्की औशात आता ‘एक लाडका विरुद्ध एक विश्वासू’ असा तगडा राजकीय सामना रंगणार असून, आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका औसा तालुक्यातील सत्तासमीकरणे बदलणाऱ्या ठरू शकतात.

Abhiamanyu pawar, Afsar shaikh
Manikrao Kokate Politics: माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी कमी होईनात, अंजली दिघोळे यांची उच्च न्यायालयात धाव...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com