Arjun Khotkar : जालन्यात युतीसाठी भाजप इच्छूक नाही; अर्जुन खोतकरांकडूनही 'बी प्लान' तयार!

Shivsena-BJP Controversy 2025 : दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात दिसलेले खेळीमेळीचे वातावरण नंतर मात्र कायम राहिले नाही. एका कार्यक्रमाच्या श्रेयवादावरून अर्जुन खोतकर समर्थक आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.
Raosaheb Danve-Arjun Khotkar Alliance In Local Body Election News
Raosaheb Danve-Arjun Khotkar Alliance In Local Body Election NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. जालन्यात युतीच्या वाटाघाटी ठप्प झाल्याने अर्जुन खोतकरांनी बी प्लानवर काम सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

  2. खोतकरांनी खासदार कल्याण काळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर आंबेकर यांच्याशी वाढवलेली जवळीक नवे समीकरण तयार करत असल्याचे संकेत मिळत आहेत.

  3. या हालचालींमुळे आगामी निवडणुकीत जालना मतदारसंघात राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलू शकतात.

Local Body Election News : नगर परिषदेनंतर महापालिकेत रुपांतर झालेल्या जालन्यातील पहिल्याच निवडणुकीत महायुतीचे बारा वाजण्याची चिन्ह आहेत. दिवाळी स्नेहमिलनाच्या कार्यक्रमत मित्र पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येण्याची भाषा केली. पण मेळावा संपताच शिवसेना-भाजपच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी पुन्हा एकमेकांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. अर्जुन खोतकर यांनी महापौर पदासाठी दिलेला अडीच-अडीच वर्षाचा फाॅर्म्युला भाजप नेते रावसाहेब दानवे, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना मान्य नसल्याचे बोलले जाते.

शिवसेनेने दिलेला युतीचा प्रस्ताव अद्याप वेटींगवरच असल्याने अर्जुन खोतकर यांनी आपला 'बी प्लान' तयार ठेवला असल्याची जोरदार चर्चा आहे. दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर, कैलास गोरंट्याल या नेत्यांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली होती. भाजपकडे ढुंकून न पाहणारे अर्जुन खोतकर यांची भाषा कैलास गोरंट्याल यांना भाजपात प्रवेश देताच बदलली, असा टोला दानवे यांनी आपल्या भाषणात लगावला होता.

तर भास्कर दानवे यांना नगराध्यक्ष करा असा प्रस्ताव आपण स्वतः रावसाहेब दानवे यांना दिला होता. पण तो त्यांनी का मान्य केला नाही? हे माहित नाही, असे म्हणत खोतकरांनी भाजपामध्ये वादाची ठिणगी टाकण्याचा प्रयत्न केला. दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात दिसलेले खेळीमेळीचे वातावरण नंतर मात्र कायम राहिले नाही. एका कार्यक्रमाच्या श्रेयवादावरून अर्जुन खोतकर समर्थक आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.

Raosaheb Danve-Arjun Khotkar Alliance In Local Body Election News
Raosaheb Danve-Arjun Khotkar : खोतकर- दानवेंची एकत्र येण्याची भाषा, तर पडद्यामागे वेगळ्याच हालचाली! जालन्यात युती की चकवा?

त्यानंतर अर्जुन खोतकर, खासदार कल्याण काळे, शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी जालन्यात गुंडगिरी, अवैध धंदे, दरोडे, खूनाच्या घटना वाढल्याचा आरोप करत पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले. तीन आठवड्याचा अल्टीमेटम देत संबंधितांवर आणि गुंडांना पोसणाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा काळे-खोतकर यांनी या निमित्ताने दिला.

Raosaheb Danve-Arjun Khotkar Alliance In Local Body Election News
Raosaheb Danve : 'माझ्याकडे फंड नाही, पण कार्यकर्ते, आमदार घडवण्याचा फंडा'! रावसाहेब दानवेंची टोलेबाजी

काळे-आंबेकरांशी जवळीक..

शहरातील गुंडगिरी आणि अवैध धंद्याविरोधात एकत्र आलेले अर्जुन खोतकर- कल्याण काळे- भास्कर आंबेकर हा काही योगायोग नाही, अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. महायुतीतील मित्रपक्षांमध्ये फूट पडल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना- काँग्रेस- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जवळीक वाढू लागली आहे. भाजपाकडून युतीची फारशी अपेक्षा न ठेवता दुसरे समीकरण जुळवून जालन्याच्या महापालिकेत पहिला महापौर शिवसेनेचा बसवण्यासाठी अर्जुन खोतकर यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष नारायण कुचे यांच्यासोबत अर्जुन खोतकर यांची युती संदर्भात बैठक झाली असली तरी ती जिल्ह्यातील नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदेसाठी असल्याचे बोलले जाते. या बैठकीत महापालिकेचा कुठलाही विषय झाला नाही. महापालिकेत युती करायची की नाही? याचे अधिकार रावसाहेब दानवे, कैलास गोरंट्याल, महानगराध्यक्ष भास्कर दानवे हेच घेणार आहेत. परंतु खोतकरांच्या प्रस्तावावर या तिघांनी अद्याप कुठलाच निर्णय घेतलेला नाही. भाजपसोबत फरफटत जाण्याऐवजी खोतकरांनी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत जवळीक वाढवल्याचे चित्र आहे.

FAQs

1. अर्जुन खोतकरांचा बी प्लान म्हणजे नेमकं काय?
→ युतीत अडथळे आल्यामुळे खोतकरांनी वैकल्पिक राजकीय पर्याय तयार केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

2. खोतकर, कल्याण काळे आणि भास्कर आंबेकर यांच्यात काय चर्चा झाली?
→ राजकीय समन्वय आणि स्थानिक शक्ती एकत्र आणण्याबाबत चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

3. युतीचे घोडे अडले याचा अर्थ काय?
→ भाजप-शिवसेना आणि स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद झाल्याने उमेदवार ठरवण्यात अडचणी येत आहेत.

4. या हालचालीचा जालना मतदारसंघावर काय परिणाम होईल?
→ मतदारसंघात नवीन राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो.

5. महायुतीत मतभेद वाढले आहेत का?
→ होय, काही स्थानिक नेत्यांच्या भूमिका आणि प्रभावामुळे अंतर्गत मतभेद वाढत असल्याची चिन्हे दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com