Jalna Dhangar Reservation : जालन्यात धनगर आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक, वाहनांची तोडफोड

Jalna Collector's Office Vandalized Vehicles : आंदोलकांनी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या खासगी वाहनासह इतर वाहनांची तोडफोड केली.
Jalna Collector's Office
Jalna Collector's OfficeSarakrnama
Published on
Updated on

Jalna Dhangar Reservation : धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाची ‎(एसटी) अंमलबजावणी करण्यात यावी. यासाठी समस्त धनगर समाजाच्या वतीने मंगळवारी जालना शहरातील‎ गांधी चमन येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर मागणीचे निवेदन देण्यासाठी निघालेल्या शिष्टमंडळासोबत आंदोलनात सहभागी झालेले आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले.

या वेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या खासगी वाहनासह इतर वाहनांची तोडफोड केली. त्याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करण्याचाही प्रयत्न झाला.

Jalna Collector's Office
Pimpri Chinchwad News : निलंबित लाचखोरांना पिंपरी महापालिकेने पुन्हा घेतले कामावर, फडणवीसांचे नागपूरही चर्चेत आले

धनगर (Dhangar) समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला जालना जिल्ह्यात हिंसक वळण लागले. जालना शहरात काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड करत दगडफेक केली.

मोर्चा दरम्यान, धनगर समाजाच्या मागण्याचे निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी न झाल्याने आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी कार्यालयाच्या परिसरातील तोडफोड केली. त्यानंतर दगडफेक करण्यात आली.

धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावे, ही अनेक वर्षांची मागणी आहे. मात्र, याची अंमलबजावणी न झाल्याने धनगर समाज आक्रमक झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

आंदोलन शेवटच्या टप्प्यापर्यंत शांततेत सुरू होते. मात्र, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळासोबत आंदोलनात सहभागी झालेले आंदोलकही जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात घुसले.

या जमावाने जिल्हाधिकारी कार्यालयात पार्क केलेल्या दुचाक्या, फुलांचे झाड आणि जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या खासगी वाहनासह अन्य एका चारचाकी वाहनाची तोडफोड केली. (Protest)

पोलिसांच्या मध्यस्थीमुळे जमाव नियंत्रणात

त्यासोबतच जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी करून जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसलेला सर्व जमाव बाहेर काढला. मात्र, या घटनेमुळे या आंदोलनाला उग्ररूप प्राप्त झाले.(Collector Office)

(Edited by Sachin Waghmare)

Jalna Collector's Office
Dhangar Reservation : धनगर आरक्षणावर आज तोडगा निघणार? राम शिंदे पुन्हा आंदोलकांना भेटणार

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com