Jalna Lok Sabha Constituency : रावसाहेब दानवेंच्या अंगणात खासदार काळेंनी दंड थोपटले, आता 25 वर्ष मीच खासदार...

Marathwada Political News : गेल्या 30-35 वर्षात काँग्रेसने असा उत्साह व जल्लोष याआधी कधी पाहिला नव्हता. भोकरदनमधून काळे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
Kalyan Kale, Raosaheb Kale
Kalyan Kale, Raosaheb KaleSarkarnama

Bhokardan News : लोकसभेच्या जालना मतदारसंघात ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर काँग्रसेचे खासदार डाॅ. कल्याण काळे चांगलेच जोशात आहेत. आज मतदारसंघातील भोकरदन-जाफ्राबादमध्ये काळे यांचे जंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आला. भोकरदन म्हणजे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि सलग पाच टर्म खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवे यांच्या अंगणातच कल्याण काळे यांनी दंड थोपटले. आता पंचवीस वर्ष मीच खासदार, असा दावा करत काळे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. 

गेल्या 30-35 वर्षात काँग्रेसने असा उत्साह व जल्लोश याआधी कधी पाहिला नव्हता. भोकरदनमधून काळे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी आमदार चंद्रकांत दानवे हे देखील होते. यावेळी नव्या खासदारांसोबत फोटो काढण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ लागली होती. 

ढकलाढकली सुरू असताना काळे त्यांना उद्देशून म्हणाले, अरे गड्याहो गडबड, गोंधळ करू नका, मी काही पाच महिन्यासाठीच खासदार नाही. पाच वर्ष असणार आहे. त्यामुळे इथे वारंवार येतच राहणार आहे, फोटोही काढणार आहे. तुमचा आशिर्वाद आणि इच्छा असली तर पुढील पंचवीस वर्ष मीच खासदार राहील, तशी इथली परंपराच आहे, असा टोला काळे यांनी लगावला.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा तब्बल 39 वर्षांनी पराभव करत काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी एक आगळा-वेगळा रेकाॅर्ड केला. तब्बल एक लाख दहा हजारांच्या मताधिक्याने काळेंनी विजय मिळवल्यामुळे जिल्हा काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भोकरदन मधील मिरवणुकीत तर हा उत्साह शिगेला पोहचला होता.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत खऱ्या अर्थाने जायंट किलर ठरलेले  खासदार डॉ. कल्याण काळे यांचा आज श्रीकृष्ण मंगल कार्यालयात महाविकास आघाडी तर्फे जंगी सत्कार करण्यात आला. त्याआधी भोकरदन शहरातून डीजेच्या दणदणाटात काळे यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर काळे त्यांच्या खांद्यावर बसून नाचले. 

Kalyan Kale, Raosaheb Kale
Sudhir Mungantiwar On MVA : 'मविआ'च्या पत्रकार परिषदेनंतर मुनगंटीवारांनी डिवचलं, म्हणाले, कासव एकदाच जिंकतं पण ससा...

कार्यकर्त्यांनी कल्याण काळे (Kalyan Kale) यांचे किंग तर काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांना किंगमेकर ठरवत त्यांचे बॅनर झळकावले. याचीही मिरवणूकीत चांगली चर्चा होती. काळे यांच्या सत्कारासाठी कार्यकर्त्यांची एकच झुंबड उडाली. नव्या खासदारांसोबत फोटो असावा यासाठी कार्यकर्ते धडपड करत होते. अखेर कल्याण काळे यांनी कार्यकर्त्यांना गर्दीतून बाजूला सारत हात जोडून आवाहन केले. 

`अरे गड्याहो मी काही पाच महिन्यासाठी खासदार नाही, पुढील पाच मीच खासदार असणार आहे. आपल्या जालना लोकसभा मतदार संघाची आतापर्यंतची परंपरा तर 25 वर्ष सलग खासदार ठेवण्याची आहे. तुमचे प्रेम बघता ते देखील शक्य होऊ शकते. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, मी तुमच्याकडे नेहमीच येत राहणार आहे. फोटो नंतरही काढता येतील. काळे यांनी असा टोला लगावल्यावर कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली.

फुलंब्री व भोकरदन असा भेदभाव मी करत नाही. लीड कुठून कमी मिळाली आणि कुठून जास्त हे महत्त्वाचे नाही. 35 वर्षांची सत्ता उलथवून टाकत तुम्ही मला भोकरदन तालुक्यातून मताधिक्य दिले याबद्दल मी तुमचे आभार मानण्यासाठी आलो आहे, असेही काळे यावेळी म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Kalyan Kale, Raosaheb Kale
Eknath Khadse News : आपल्याच 'इच्छे'ने अडचणीत आलेल्या भुजबळांच्या मदतीला धावला अखेर 'हा' जुना सवंगडी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com