Jalna Lok Sabha: विकासावर बोला! दानवेंचं आव्हान काळेंनी स्वीकारलं...

Raosaheb Danve On Kalyan Kale: प्रचाराच्या रणधुमाळीत एका सभेदरम्यान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या कल्याण काळे यांना जाहीर आव्हान दिलं आहे.
Kalyan Kale, Raosaheb Danve
Kalyan Kale, Raosaheb DanveSarkarnama
Published on
Updated on

Jalna Lok Sabha Election 2024: जालना लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. या मतदारसंघात भाजपने पुन्हा एकदा रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना संधी दिली आहे. तर महाविकास आघाडीने काँग्रेसच्या कल्याण काळे (Kalyan Kale) यांना रिंगणात उतरवले आहे. महत्वाची बाब म्हणजे दानवे सहाव्यांदा लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. सध्या या दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु असून या प्रचारादरम्यान ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

अशातच प्रचाराच्या रणधुमाळीत एका सभेदरम्यान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवत असणाऱ्या कल्याण काळे यांना जाहीर आव्हान दिलं आहे. विकासाच्या मुद्द्यावरून मी एक व्यासपीठ उभं करतो, त्या व्यासपीठावर येऊन काळे यांनी विकासावर बोलावं, त्यांनी हे चॅलेंज स्वीकारलं तर मी निवडणुकीतून माघार घेईन, असं दानवेंनी म्हटलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दानवेंच्या या वक्तव्यावर काळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कल्याण काळे यांनी दानवेंच चॅलेंज स्वीकारलं आणि ते म्हणाले, मी दहा वर्षाच्या काळात आमदार असताना जी विकासकामे करायची होती ती केली. मी केलेल्या कामांची लेखी यादी देण्यास तयार आहे. मात्र दानवे यांनी 35 वर्षाच्या राजकारणात काय विकास केला? असा प्रश्न काळे यांनी उपस्थित केला. शिवाय आम्ही आणलेल्या दिल्ली-मुबंई इंडस्ट्रियल कॉरेडोर सारखी औद्योगिक वसाहत उभारली त्यात साधा एक कारखाना त्यांना आणता आला नाही. त्यामुळे जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यातील तरुणांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत.

Kalyan Kale, Raosaheb Danve
Nashik Lok Sabha Election : मोठी बातमी : नाशिकमधून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर

विकास म्हणजे काय? ज्यामुळे कुणाच्या घरात दोन पैसे येतील आणि त्या घराचे जीवनमान सुधारेल तो विकास असतो. मात्र दानवे विकासाच्या गप्पा करतात, ड्रायपोर्टच्या नावाचा बोर्ड उभा केला म्हणजे विकास होत नाही असा टोला त्यांनी दानवेंना लगावला. शिवाय त्यांनी शो लावावा मी देखील त्यांना उत्तर द्यायला तयार आहे असं म्हणत काळे यांनी दानवेंचं चॅलेंज स्वीकारलं आहे. त्यामुळे आता हे उमेदवार खरंच एकमेकांसमोर विकासाच्या मुद्यावर चर्चा करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com