Maratha Reservation News : सगेसोयऱ्यांबाबतचा निर्णय निवडणुकीनंतर : अशोक चव्हाण यांचे मोठे विधान

Ashok Chavan अशोक चव्हाण यांनी सांगितले की, मागील दहा वर्षात केंद्रातील मोदी सरकारने जबरदस्त कामे केली आहेत. या कामाला कसलीही तोड नाही.
Ashok Chavan, Eknath Shinde
Ashok Chavan, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

-राम काळगे

Nilanga News : मराठवाड्यातील सर्वच जागावर महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित असून मराठा समाजासाठी राज्यातील एकनाथ शिंदे सरकारने मराठा समाजातील कुणबीसाठी विशेष अधिवेशन घेऊन दहा टक्के आरक्षण दिले आहे या आरक्षणाला कोणत्याही कोर्टाकडून स्थगिती नाही. सध्या लोकसभा निवडणूक आहे. सग्या सोयऱ्याबाबत हरकती मागवण्यात आल्या असून आचारसंहिता संपल्याल्यानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे मोठे विधान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी निलंगा येथील जाहीर सभेत केले.

महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी निलंगा येथे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची सभा शुक्रवारी आयोजित केली होती. यावेळी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले की, मागील दहा वर्षात केंद्रातील मोदी सरकारने जबरदस्त कामे केली आहेत. या कामाला कसलीही तोड नाही.

पायाभूत सुविधा, रेल्वे, रोजगार याबाबतीत मोठ्या प्रमाणात कामे झाली. ही निवडणूक देशाचा कारभार कोणाकडे सोपवायचा याच्यासाठी होत आहे. त्यामुळे जनतेने विचार करून विकासाला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. केंद्र व राज्यातील सरकारने रोजगार निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात योजना आणल्या. राज्यातील सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सोडविला असेही चव्हाण म्हणाले.

Ashok Chavan, Eknath Shinde
Marathwada Political News : मराठवाड्यातील पालकमंत्र्यांनी लोकसभेचे मतदारसंघ सोडले वाऱ्यावर?

शिवाय शिंदे, फडणवीस व पवार सरकारने विशेष अधिवेशन घेऊन राज्यातील मागास गरीब मराठा समाजातील लोकासाठी दहा टक्के आरक्षण जाहीर केले असुन सध्या प्रमाणपत्र मिळत आहेत. सध्या कोणत्याही कोर्टाने याबाबत स्थगिती दिली नाही हे सरकार जनतेच्या हिताचे सरकार असून मी स्वतः मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हा राजकीय प्रश्न नाही, मी तुमचा भाऊ आहे असे सांगून सग्या सोयऱ्याबाबतही हरकती घेणे सुरू आहे. लवकरच आचारसंहिता संपल्यानंतर याबाबत सुनावणी घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. कोणतेही आरक्षण दिल्यानंतर ते टिकले पाहीजे याचाही आभ्यास करण्याची गरज असाल्याचे अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले. दुपारच्या रखरखत्या उन्हात सभेसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

Edited By : Umesh Bambare

Ashok Chavan, Eknath Shinde
Ashok Chavan News : अशोक चव्हाणांची मोठी राजकीय भविष्यवाणी, म्हणाले 'लोकसभेनंतर...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com