Raju Patil News: 2014 सालची शरद पवारांची जर सुपारी असेल, तर होय आम्हीही...! मनसेच्या राजू पाटलांनी घेतली शाळा

MNS Raj Thackeray News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीकडून त्यांच्यावर सतत टीका करण्यात येत आहे.
Sharad Pawar, Jitendra Awhad, Raju Patil
Sharad Pawar, Jitendra Awhad, Raju Patil Sarkarnama
Published on
Updated on

MNS MLA Raju Patil News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीकडून त्यांच्यावर सतत टीका करण्यात येत आहे. अशातच राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राज ठाकरेंना कोणी सुपारी दिली आहे बघा? अशी बोचरी टीका केली आहे.

आव्हाडांच्या या टीकेला आता मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जर 2014 ला भाजपला शरद पवारांनी बिनशर्थ पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी असेल तर होय आमची ही सुपारी आहे, असं म्हणत पाटील यांनी आव्हाडांवर पलटवार केला.

आज राज्यात पाचव्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं. या मतदानानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज यांच्यावर टीका केली. आव्हाड म्हणाले, "राज ठाकरेंचा (Raj Thackeray) कोणाला पाठिंबा आहे, हे त्यांच्या मतदानावरुन त्यांच्या उमेदवारावरुन आणि त्यांच्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवरून कळतं. राज ठाकरे यांचा फक्त स्वतःला पाठिंबा आहे. उठा दुपारी घ्या सुपारी, भाजपने राज ठाकरे यांना ठाण्याचं वातावरण खराब करण्याची सुपारी दिली होती," असा गंबीर आरोप आव्हाडांनी (Jitendra Awhad) केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आव्हांडाच्या या वक्तव्यावर राजू पाटील (Raju Patil) यांनी प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, "जर 2014 ला शरद पवारांनी (Sharad Pawar) जेव्हा युती तुटली होती, तेव्हा भाजपचे126 आमदार निवडणून आले होते, त्यावेळी त्यांनी न मागता बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे 2014 सालची ती जर सुपारी असेल, तर होय आम्हीदेखील ही सुपारी घेतली आहे."

Sharad Pawar, Jitendra Awhad, Raju Patil
Uddhav Thackeray News: मतदान संपण्याच्या काही तास आधी ठाकरेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; म्हणाले, 'आमचं मतदान जास्त तिथेच...'

दरम्यान, राज ठाकरेनी जेवढी मेहनत भाजपसाठी (BJP) केली, तेवढी मेहनत स्वतःच्या पक्षासाठी केली असती तर पक्ष वाढला असता, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज यांना डिवचलं होतं. तर राऊतांच्या या टीकेवर बोलताना आमदार पाटील म्हणाले, आमच्या पक्षाचं आम्ही बघून घेऊ, त्यांनी चिंता तुम्ही करायची गरज नाही. मात्र 4 जूननंतर राऊतांना स्वतःची चिंता करावी लागणार आहे.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com