Obc Melava Jalna : देवेंद्र फडणवीसांचा उदो उदो करणाऱ्या आशिष देशमुखांना भरसभेत आयोजकांनी झापलं

Obc Melava Jalna Ashish Deshmukh : मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण तापलेलं असताना जालन्यात ओबीसींचा पहिला मेळावा झाला...
Ashish Deshmukh
Ashish DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Abc Elgar Ambad Jalna : जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा झाला. या मेळाव्यात भाजप नेते माजी आमदार आशिष देशमुख यांना भर कार्यक्रमात मेळाव्याच्या आयोजकांनी झापलं. आशिष देशमुखांनी भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला आणि तो भोवला. कुठल्याही वक्त्याने आपल्या नेत्याचा उदो उदो करू नये, असं आयोजकांनी सुनावलं.

काय म्हणाले होते आशिष देशमुख?

बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात ओबीसी समाजाचे मोठे आंदोलन नागपूरमध्ये झाले. देवेंद्र फडणवीस हे तिथे सर्वप्रथम आले. कोणत्याही प्रकारे ओबीसी आरक्षणात नवीन वाटेकरी येऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी राज्यातील ओबीसी समाजाला दिली, असं आशिष देशमुख हे आपल्या भाषणात म्हणाले.

सरसकटपणे मराठा समाजाला कुणबी दाखले देणार नाही, हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सांगितलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, ही ओबीसींचीही भूमिका आहे. पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हे मराठ्यांना आरक्षण दिलं जावं, अशी स्पष्ट भूमिका आहे. ज्या पद्धतीने गेल्यावेळी मराठा सामाजाला वेगळं आरक्षण देण्यात आलं होतं. त्या पद्धतीचं आरक्षण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला मिळावं, असं आशिष देशमुख म्हणाले.

पिढ्यानं पिढ्या ओबीसी आणि मराठा समाज गुण्यागोविंदानं नांदत आला आहे. त्यात तेढ निर्माण करण्याचं काम जरांगे पाटील करत आहेत. महाराष्ट्रा सामाजिक सलोखा राखण्याची परंपरा जपली गेली पाहिजे. ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस सरकारने मराठ्यांना वेगळं आरक्षण दिलं होतं, तसं दिलं जावं, असं आशिष देशमुख म्हणाले. पण कुठेतरी विष कालवण्याचं काम होतंय आणि याचा निषेध या महावेळाव्यातून केला पाहिजे, असं ते पुढे म्हणाले.

आम्ही आयोजक सर्वपक्षांचे आणि जातीचे मिळून एकत्र आलोय. ओबीसी बांधवांसाठी हा मेळावा आहे. यामुळे कोणीही आपल्या पक्षाची राजकीय भूमिका मांडू नये आणि आपल्या नेत्याचा उदो उदो या व्यासपीठावरून नये. नाहीतर ओबीसी समाज आपल्या पद्धतीने विचार केल्याशिवाय राहणार नाही, असं आयोजकांनी सुनावलं.

दरम्यान, आशिष देशमुख यांच्या भाषणानंतर मेळाव्यात उपस्थित कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी आशिष देशमुखांच्या वक्तव्याचा निषेध करत गोंधळ घातला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि कार्यकर्त्यांना शांत केलं.

Ashish Deshmukh
OBC Melava : अंबडमधील ओबीसी मेळाव्याला पंकजा मुंडेंची अनुपस्थिती

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com