OBC Melava : अंबडमधील ओबीसी मेळाव्याला पंकजा मुंडेंची अनुपस्थिती

Pankaja Munde News : मेळाव्याच्या बॅनरवर माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा फोटो छापण्यात आलेला आहे. मात्र, मेळाव्यासाठी त्या उपस्थित राहिलेल्या नाहीत.
Pankaja Munde
Pankaja Munde Sarkarnama

Jalna News : जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसींचा महाएल्गार मेळावा होत आहे. त्या मेळाव्यासाठी राज्यभरातील सर्व पक्षांमधील ओबीसी नेते एकाच व्यासपीठावर आले आहेत. मात्र, माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे मेळाव्याला अनुपस्थित होत्या. त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा मेळाव्यास्थळी होती. (Absence of Pankaja Munde from OBC Melava in Ambad)

ओबीसी आरक्षणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने राज्यातील ओबीसींचा महाएल्गार मेळावा अंबड येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी आमदार प्रकाश शेंडगे, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार देवयानी फरांदे, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह विविध नेते उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pankaja Munde
SugarCane FRP Issue : राजू शेट्टी आक्रमक; ‘आठ दिवस थांबा, कारखानदारांना गुडघे टेकायला लावतो’

मेळाव्याच्या बॅनरवर माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा फोटो छापण्यात आलेला आहे. मात्र, मेळाव्यासाठी त्या उपस्थित राहिलेल्या नाहीत. खरं तर पंकजा मुंडे ह्या यापूर्वी झालेल्या ओबीसींचे मेळावे आणि कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिल्या आहेत. (स्व.) गोपीनाथ मुंडे हे ओबीसींच्या न्याय हक्कासाठी कायम भांडायचे. त्यामुळे पंकजा मुंडे ह्या जालना जिल्ह्यातील अंबड येथे होणाऱ्या मेळाव्यासाठी उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. मात्र, त्या मेळाव्याला उपस्थित राहिलेल्या नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा मात्र रंगली आहे.

दरम्यान, या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले माजी मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, आमदार महादेव जानकर हे भाषण न करताच निघून गेले. त्यांनी अवघे एक मिनिट बोलून व्यासपीठ सोडले. जोपर्यंत ओबीसींचा पक्ष उभा राहत नाही, तोपर्यंत आपल्या लढ्याला अर्थ राहणार नाही. काँग्रेस, भाजपचा ओबीसी नेता येईल आणि तुम्हाला लुटून नेईल. भुजबळ यांना माझी विनंती आहे की, तुम्ही पक्ष काढा आणि त्या माध्यमातून ओबीसींना उभं करा, दुसऱ्या पक्षाचे आमदार, खासदार येऊन तुम्हाला सांगतील की, ह्याला मतदान करा. त्याला ओबीसी म्हणू नका, असा सल्लाही जानकर यांनी दिला.

Pankaja Munde
Balasaheb Thackeray Memorial Day : कडेकोट बंदोबस्तात ठाकरे कुटुंबीयांनी घेतले बाळासाहेबांच्या स्मृतींचे दर्शन

ओबीसी मेळाव्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर हे उशिरा आले. ते थेट हेलिकॉप्टरने अंबडमध्ये सभास्थळी दाखल झाले. त्यांचे हेलिकॉप्टर सभास्थळावरून येत असताना उपस्थितांनी एकच गलका केला. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांची दिमाखदार एन्ट्री झाली.

Pankaja Munde
Nashik Leopard News : शिवसेना नेते बडगुजर यांच्या कार्यालयात बिबट्या...एक नव्हे तब्बल चार!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com