OBC Elgar Meeting : 'जिस की जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी !' ; वडेट्टीवारांचे जरांगे पाटलांना चॅलेंज

OBC Vs Maratha Reservation : काच फुटल्याचे दुःख नाही. दगड कुठून आला, हे महत्वाचे..
Vijay Wadettiwar, Manoj Jarange
Vijay Wadettiwar, Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : ओबीसी समाजात साडेतीनशेहून अधिक जाती आहेत. त्यातील बहुतांश जातीतील लोकांचे हातावर पोट आहे. अशा मागास समाजाचे आरक्षणाचा हिस्सा मोठा भाऊ म्हणवून घेणारे मागत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार केली. तसेच देशात जातीनिहाय जणगणना झाली तर मग कळेल कुणाची संख्या मोठी आहे, असे चॅलेंज वड्डेवार यांनी नाव न घेता मनोज जरांगे यांच्यासह मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या सर्व पक्षीय नेत्यांना केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार सभेत वड्डेवारांनी मनोज जरांगे पाटलांसह मराठा नेत्यांचा समाचार घेतला.

वडेट्टीवार म्हणाले, 'आमच्या पिढ्यानपिढ्या जमिनी कमी झाल्या, असे तुम्ही सांगत आहेत. मात्र ज्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या जमीनीच नसतील तर त्यांची व्यथा काय असेल? याचा विचार कोण करणार ?' असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

'मोठा भाऊ म्हणताय आणि लहान भावाच्या ताटातील काढून घेत असाल तर मग तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही,' असा इशाराही त्यांनी मराठा नेत्यांना दिला आहे.

Vijay Wadettiwar, Manoj Jarange
Maratha Vs OBC Reservation : ऐन दिवाळीत राजकीय धुळवड; महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय ?

देशात जातीनिहाय जणगणना झाली तर ओबीसींची संख्या जास्त असेल, असा दावाही वड्डेवारांनी केला. ते म्हणाले, 'भुजबळांना आवाहन करतो की पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करू की एकदा देशातील जातीय गणना करून टाका. मग तुम्हाला कळेल 'जिस की जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी! मग कशाला तुम्ही इतका हट्टहास करताय ?' (Maharashtra Political News)

तुमच्या लेकरांच्या फायद्यासाठी आम्हाला बकरे करून कापणार का, असाही सवालही वडेट्टीवारांनी केला. 'लेकरांच्या नावाखाली लोकांना बनवू नाका. लेकरं लेकरं लेकरं...' असे म्हणत स्टेजवरील नेत्यांकडे बोट करून वडेट्टीवारांनी 'इकडे काय तर बकरं... बकरं.. बकरं.., कापून खाण्यासाठी का?' असे म्हणाले.

'काच फुटल्याचे दुःख नाही. दगड कुठून आला, हे महत्वाचे आहे. ओबीसीतील सर्व मागास लोकांना न्याय देण्याचे आम्ही काम करू. मंत्री असतानाही मी चिंता केली नाही. पुढेही करणार नाही. अंबडची सभा तुंबड झाली. आता जिल्ह्या-जिल्ह्यात सभा घ्यावी लागले. आपल्या घामाचा कष्टाचे चीज करण्यासाठी राज्यात आम्ही उभे राहू,' असे अश्वासन देत वडेट्टीवारांनी आपण भेटत राहिलो तर वाचू, असे आवाहन केले.

(Edited by Sunil Dhumal)

Vijay Wadettiwar, Manoj Jarange
Akola Water Supply : राजकीय मतभेद विसरत पाण्याच्या मुद्द्यावर खारपाणपट्ट्यातील सरपंच एकवटले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com