Jalana News : पोलीस अधिकाऱ्याची आंदोलकाच्या कमरेत लाथ; पंकजा मुंडेंसाठी फिल्मी स्टाईल कसरत

Jalana News : जालन्यात पंकजा मुंडे यांच्या ताफा आंदोलनादरम्यान अनंत कुलकर्णी यांनी आंदोलकाला फिल्मी स्टाईलने लाथ मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी होत आहे.
Viral video from Jalna shows DSP Anant Kulkarni kicking a protester during Pankaja Munde’s convoy protest, sparking outrage and calls for action.
Viral video from Jalna shows DSP Anant Kulkarni kicking a protester during Pankaja Munde’s convoy protest, sparking outrage and calls for action.Sarkarnama
Published on
Updated on

Jalna News : पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा ताफा अडवल्याच्या रागातून पोलीस अधिकाऱ्याने आंदोलकाच्या कमरेत फिल्मी स्टाईलने लाथ घातल्याचे समोर आले आहे. जालन्यातील हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. पोलीस उपाधिक्षक अनंत कुलकर्णी असे या अधिकाऱ्यांचे नाव आहे. या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मागील काही दिवसांपासून अमित चौधरी आणि गोपाल चौधरी हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. पत्नीचे कुटुंबीयांनी तिचे परस्पर लग्न लावून दिले असल्याचा आरोप असून
कुटुंबांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. पोलिसांनी पैसे घेतल्याचा आरोप उपोषणकर्त्यांचा आहे.

याच बद्दल दाद मागण्यासाठी चौधरी यांनी आज स्वातंत्र्यदिनी जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री पंकजा मुंडे याचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने पोलीस उपाधिक्षक अनंत कुलकर्णी यांनी चौधरी यांना बाजूला करताना अगदी फिल्मी स्टाईलने उडी मारून कमरेत लाथ घातली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यानंतर कुलकर्णी यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.

या प्रकारणावर आता अनंत कुलकर्णी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ही व्यक्ती आत्मदहन करण्यासाठी गेली होती आणि त्याने स्वत:च्या अंगावर डिझेल ओतून घेतले. पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावरही त्याने डिझेल टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध बळाचा वापर केला, असे कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com