Video Devendra Fadnavis News : महायुती सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा; विजबिलाबाबत ऊर्जामंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

Political News : विविध योजनांना निधींची कमतरता पडू नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागपूर जिल्ह्यातील विविध विकास कामासाठी पाच हजार कोटी रुपये दिले असल्याचे यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केले.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : राज्य सरकारच्या सर्व योजनांना चांगला प्रतिसाद लाभत आहे. राज्य सरकारकडून महिलांसाठी सुरू असलेल्या विविध योजनांची त्यांनी माहिती दिली. आशा वर्करला मानधन वाढीबाबत आदेश निघाला आणि वाढीव पैसे या महिन्यापासून मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. त्यासोबतच महायुती सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला असून शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षांसाठी कुठलेच बिल भरण्याची गरज राहणार नाही, अशी मोठी घोषणा ऊर्जामंत्री फडणवीस यांनी केली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्र झिल्पा, भोरगड व गाटपेंढरी या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रम सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांनंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पत्रकारांशी संवाद साधला. (Devendra Fadnavis News)

राज्य सरकारकडून गेल्या काही दिवसापासून विविध योजनांना निधी देण्याबाबत घोषणा करण्यात आली आहे. त्यासोबतच राज्यातील शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफीचा जीआर राज्य सरकारने नुकताच काढलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षांसाठी कुठलेच बिल भरण्याची गरज राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पाणंद रस्ते हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यासाठी निधी राखीव ठेवला आहे, त्यासोबतच विविध योजनांना निधींची कमतरता पडू नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागपूर जिल्ह्यातील विविध विकास कामासाठी पाच हजार कोटी रुपये दिले असल्याचे यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis
Congress News : कोल्हापूर दक्षिणेत महाडिक गटाला खिंडार; गांधीनगरच्या सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य लागले पाटील गटाच्या गळाला

त्यासोबतच नागपूर जिल्हयाचा सर्वांगीण विकास व्हावा त्यासाठी आरोग्य, शैक्षणिक व मूलभूत विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. लोकप्रतिनिधीनी यावेळी काही चांगल्या सूचना केल्या आहेत. या संबधीचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले असल्याचे यावेळी फडणवीस यांनी सांगितले.

Devendra Fadnavis
Jaykumar Gore News : आमदार गोरेंच्या विरोधात याचिका करणाऱ्या देशमुखांच्या घरांवर ईडीची धाड; दबावतंत्राचा वापर ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com