

Ncp : सनातन धर्म म्हणजे मनुस्मृती आहे, ती बाबासाहेबांनी केव्हाच जाळली आहे. त्यामुळे ती आम्हाला मान्य नाही, जगातील सर्वांकडे धर्मपुस्तिका आहे, फक्त हिंदुकडेच धर्म पुस्तिका नाही, असे विधान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. (Jitendra Awhad News) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबीरात ते बोलत होते.
परखड आणि रोखठोक मते मांडण्यासाठी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) ओळखले जातात. त्यामुळे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता ते काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. सनातन धर्म आणि मनुस्मृती एकच असल्याचे सांगतांनाच ती आपल्याला मान्य नसल्याचे आव्हाड म्हणाले.
`संविधान, संसदीय लोकशाही आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर`, या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. आव्हाड म्हणाले, महाराष्ट्राचे राजकारण सध्या संक्रमण काळातून जात आहे. (Ncp) ठाण्यात काल शिवसेनेच्या अयोध्या पोळ हिच्यावर शाई फेकून मारहाण करण्यात आली. (Aurangabad) ती जेव्हा पोलीस ठाण्यात आली, तेव्हा तिच्यावर पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस आयुक्त हसत होते. यामुळे ठाण्यात कायदा सुव्यवस्था आहे का ? असा प्रश्न पडतो.
केरळ, तामिळनाडू मध्ये आजही काही गल्ल्यांमध्ये दलित लोकांना चपला हातात घेऊन जावे लागते. जाता जात नाही ती `जात` आहे. आपल्यातला न्युनगंड जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत ही लढाई सोडता येणार नाही. महागड्या शिक्षणामुळे नवीन निरक्षरांचा वर्ग जन्माला येईल, त्यातील मोठे प्रमाण दलित, मागास लोकांचे असेल, अशी भितीही आव्हाड यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.