Beed News : नवर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुण दारुच्या पार्ट्या करतात. याच निमित्ताने तरुण व्यसनाकडे वळतात. त्यामुळे नववर्षाला सांस्कृतिक कार्यक्रम व उपस्थितांना प्यायला गोड दूध असा उपक्रम विनायकराव मेटे(Vinayak Mete) अनेक वर्षे राबवत होते. आता विनायक मेटेंच्या निधनानंतर त्यांचे व्यसनमुक्तीचे कार्यं त्यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनी पुढेही सुरु ठेवले आहे.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. 30) बीड शहरातून व्यसनमुक्तीबाबत जनजागृती फेरी निघेल. तर, रविवारी (ता. 31) सांस्कृतिक कार्यक्रमाने नववर्षाचे स्वागत होईल.
शनिवारी शहरातूनन निघणाऱ्या व्यसनमुक्ती जनजागृती फेरीत शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी, तरुण, परिचारिका, डॉक्टर, नागरिक सहभागी होणार आहेत. तर, व्यसनमुक्ती अभियाना अंतर्गत दहा नामवंत कलावंतांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तुकाराम रुरल अँड ह्युमन डेव्हलपमेंट चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या पुढाकाराने हा उपक्रम होईल.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जिल्ह्यात उद्योग नाहीत, शेतीला सिंचन नाही, त्यामुळे तरुण व्यसनाकडे वळतात. याची सर्वाधिक सुरुवात 31 डिसेंबरच्या रात्री नववर्षाच्या पार्टीला होते, असे दिवंगत विनायकराव मेटे म्हणत. त्यामुळे त्यांनी मागील अनेक वर्षे शहरात व्यसनमुक्ती फेरी व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती जनजागृतीचे प्रयत्न केले.
त्यांच्या पश्चात मागच्या वर्षी त्यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), मंत्री गिरीश महाजन, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. जिल्ह्यातील तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती चळवळीचे सातत्य कायम ठेवण्यात येणार असल्याचे संयोजकांनी म्हटले आहे.
''राजकारणापेक्षा त्यांनी कायम समाजकारण केले. निवडणुकीतही व्यसनाबाबत त्यांनी कधीच तडजोड केली नाही. व्यसनमुक्तीची चळवळ सातत्याने पुढे सुरु ठेवणार आहोत. यंदाही नामवंत कलावंत बीडकरांच्या भेटीला येतील.'' असं शिवसंग्रामच्या प्रमुख डॉ. ज्योती मेटे यांनी सांगितले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.