Assembly Session : सरकार उद्या कोणालाही तुरुंगात टाकेल; ...ही तर निवडणुकीची पूर्वतयारी : पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर गंभीर आरोप

Prithviraj Chavan, Vijay Wadettiwar Vs Rahul Narvekar : महाराष्ट्र विशेष जनुसरक्षा विधेयक-2014 दाखवले आहे. मात्र, हे विधयेक लगेच मांडून पास केले जाणार आहे.
Prithviraj Chavan, Vijay Wadettiwar, Rahul Narvekar
Prithviraj Chavan, Vijay Wadettiwar, Rahul NarvekarSarkarnama

Mumbai, 11 July : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेतील कार्यक्रम पत्रिकेवर हरकतीचा मुद्दा मांडत महाराष्ट्र विशेष जनुसरक्षा विधेयक- २०२४ विधेयकावर आक्षेप घेतला. हे विधेयक मंजूर केले तर सरकार कुणालाही अर्बन नक्षलवादी म्हणून अटक करून तुरुंगात टाकू शकेल. निवडणुकीची ही पूर्वतयारी आहे. तुम्हा याला मंजुरी दिलीच कशी, असा सवाल चव्हाण यांनी केला. त्यांना नियम सांगून विधानसभा अध्यक्षांनी कामकाज पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार चव्हाणांच्या मदतीला आले. वडेट्टीवारांची सूचना मान्य करत राहुल नार्वेकरांनी याबाबतचा निर्णय आपण घेऊ, असे सांगून पृथ्वीराजबाबांच्या हरकतींवर विचार करण्याचा शब्द दिला.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी आजच्या कार्यक्रम पत्रिकेवर हरकत घेतली. ते म्हणाले, सहाव्या क्रमांकामध्ये शासकीय विधेयके (BILL) दाखवली असून त्यात महाराष्ट्र विशेष जनुसरक्षा विधेयक-2024 (Maharashtra Special Janusraksha Bill) दाखवले आहे. मात्र, हे विधयेक लगेच मांडून पास केले जाणार आहे. विधेयकाची प्रत अजूनही मिळालेली नाही.

या विधेयकाच्या नावाखाली तुम्ही उद्या कोणालाही अटक करू शकणार आहात. हा लपून छपून कायदा आणायचं चालंल आहे. बिल अजून छापलेलं नाही. कदाचित मंत्र्यांनाही त्याबाबत माहिती नसावं. या विधेयकासाठी एक दिवसाचा अवधी तरी मिळायला पाहिजे. तुम्ही हे विधेयक पास करायला परवानगी कशी दिली, असा सवाल चव्हाण यांनी केला.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यावर स्पष्टीकरण देताना पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळे त्यांना नियम १२३ अवगत करायची गरज नाही. पण, आपण मुख्यमंत्री असतानाही अनेक विधेयके एकाच दिवशी मांडून ती पास केली आहेत. त्यामुळे या कामकाजात कुठलीही अनियमितता नाही, असे सांगितले.

नार्वेकरांच्या स्पष्टीकरणानंतर पृथ्वीराजबाबांनी आपला मुद्दा पुढे रेटला. हा कायदा पास केला तर सरकार कुणालाही अर्बन नक्षलवादी म्हणून अटक करू शकेल, तुरुंगात टाकू शकेल. निवडणुकीची ही पूर्वतयारी आहे. एकाच दिवशी मांडून बिल मंजूर करता येतं. पण, बिल वितरित तरी केलं पाहिजं. जोपर्यंत हे बिल वितरीत होत नाही, तोपर्यंत हा विषय स्थगित करावा, अशी मागणी त्यांनी केली.

Prithviraj Chavan, Vijay Wadettiwar, Rahul Narvekar
NCP Incoming News : अशोकरावांच्या गडाला सुरुंग लावत नांदेडपासूनच राष्ट्रवादीत इनकमिंग; कोण कोण संपर्कात?, जयंतरावांनी सर्वच सांगितले...

बिलाची कॉपी आपल्यापर्यंत पोचविण्याची सोय त्वरित करण्यात येईल, असे उत्तर राहुल नार्वेकर यांनी दिले. पण, त्यावरही पृथ्वीराज चव्हाणांचे समाधन झाले नाही. त्यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार बोलायला उठले. ‘यापूर्वीचे दाखले देऊन आपण जे म्हटलं आहे, त्याबाबत आमचं काही दुमत नाही,’ असे म्हटलं. त्यावर नार्वेकरांनी आक्षेप घेत विरोधी पक्षनेत्यांनी चुकीचं रेकॉर्डवर आणणं थांबवलं पाहिजे. कारण मी एका दिवसांत बिल मांडून कसं पास करता येते, हे नियमाद्वारे दाखवून दिलं होतं. त्यासाठी मागील दाखले दिले नव्हते.

नार्वेकर यांनी घेतलेल्या आक्षेपावर वडेट्टीवार यांनी काहींशी नरमाईची भूमिका घेत विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात बोलायचा आम्हाला अधिकार नाही. पण, आमच्या भावनांची आपण थोडीशी काळजी करावी. एवढीच आमची अपेक्षा आहे. महत्वाचे बिल असून ते सकाळीच दिलं असतं, तर आम्हाला चर्चा करता आली असती. बिल मांडायचं आणि लगेच मंजूर करायचं, हे चुकीचं होतंय. महत्वाचं बिलं आहे, म्हणून यावर चर्चा व्हायला पाहिजे. साधं बिल असतं तर आम्हीच मंजूर करा असे सांगितले असते. या बिलावर बोलण्यासाठी थोडा वेळ द्यावा. हे बिल आज मांडावं आणि उद्या त्यावर चर्चा करून संमत करावं, अशी मागणी केली.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांची सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मान्य करत यासंदर्भातील निर्णय आपण घेऊ आणि त्याबाबत मी सभागृहाला अवगत करेन, असे उत्तर दिले. त्यानंतर विधानसभेचे कामकाज पुढे सुरळीत सुरू झाले.

Prithviraj Chavan, Vijay Wadettiwar, Rahul Narvekar
Jayant Patil : दिवा विझताना जास्त फडफडतो...तशी महायुती सरकारची सध्याची अवस्था : जयंत पाटील यांची टीका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com