Vinayak Raut : विनायक राऊतांची विधान भवनात एन्ट्री; विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणता निरोप घेऊन आले?

Vidhan Parishad Election : माजी खासदार विनायक राऊत लोकसभेच्या निवडणुकीनंतर आज विधान भवनात आले. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची विधान भवनातील एन्ट्रीने राजकीय चर्चेला उधाण आले.
Vinayak Raut
Vinayak RautSarkarnama

Mumbai, 11 July : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचले गेले. शिवसेनेत बंड घडवून आणले गेले. त्या पाठोपाठ शिवसेनेतील गद्दारांनी भारतीय जनता पक्षाशी हात मिळवणी करून सरकार स्थापन केले. यानंतर एकनाथ शिंदेंना रोज नको त्या शब्दांत बोलून त्यांच्या बंडावर आक्रमकपणे हल्ला करणारे विनायक राऊत हे ठाकरेंचे निष्ठावंत.

लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. परंतु विनायक राऊत (Vinayak Raut) हे ठाकरे यांचे आक्रमक नेते असून ते घरी बसून राहण्यापेक्षा दैनंदिन आणि पक्षाच्या कामात सक्रिय आहेत. यातच त्यांनी आज विधान भवनात (Vidhan Bhavan) हजेरी लावली. विधान परिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर त्यांची ही हजेरी काही राजकीय संकेत देणारी असल्याचे बोलले जाते.

विनायक राऊत हे ठाकरेचे निष्ठावंत मानले जातात. ठाकरेंवरचा प्रत्येक हल्ला तेवढ्याच आक्रमकपणे आणि शिताफिने परतवून लावणारे आणि लोकसभेमध्ये शिवसेनेचा आवाज सतत घुमविणारे विनायक राऊत लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले. त्यामुळे ठाकरेंच्या एका शिलेदाराला घरी बसावे लागले.

विनायक राऊतांसारखे निष्ठावंत, कडवट आणि तेवढ्याच जहरी शब्दांत विरोधकांचा समाचार घेणाऱ्या नेत्याला विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी सक्रिय केले. त्यामुळे विधानभवनात आलेल्या विनायक राऊतांची एन्ट्री राजकीय चर्चेचा विषय ठरली.

ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकरांना विधान परिषदेचे तिकीट मिळाले. त्यानंतर विनायक राऊत यांच्याकडे नेमकी कुठची जबाबदारी राहणार, याची चर्चा अजूनही आहे. पण लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरच्या पहिल्या दिवसापासून विनायक राऊत हे पक्षात सक्रिय असून ते रोज मातोश्रीवर वेगवेगळ्या कामानिमित्त असतात. मातोश्री, शिवालय आणि शिवसेना भवनात बैठका घेत असल्याचे दिसते. राऊत आज एकाएकी विधानभवनात आले, त्यामुळे राऊत खासदार नसले, तरी शिवसेनेत तेवढेच सक्रिय राहणार असल्याचे संकेत आहे.

Vinayak Raut
Assembly Session : सरकार उद्या कोणालाही तुरुंगात टाकेल; ...ही तर निवडणुकीची पूर्वतयारी : पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर गंभीर आरोप

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनायक राऊत यांची कोकणात बढती होणार असल्याचेही समजते. त्यामुळे ते शिवसेना ठाकरे पक्षात अतिशय सक्रिय असल्याचे मानले जाते. विधान परिषदेची निवडणूक उद्या होत आहे. यात पडद्या पाठीमागे आणि गणितांची जुळवाजुळव सुरू आहे.

शिवसेनेचे प्रमुख नेते महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. मिलिंद नार्वेकर यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्याचा आदेश ठाकरे यांचा आहे. त्यामुळे कोठेही रिक्स न घेण्याची तयारी शिवसेना ठाकरे पक्षाकडून घेतली जात आहे. यातूनच विनायक राऊत यांची विधानभवनातील ही एन्ट्री अतिशय महत्त्वाची मानली जाते.

Edited By : Vijay Dudhale

Vinayak Raut
NCP Incoming News : अशोकरावांच्या गडाला सुरुंग लावत नांदेडपासूनच राष्ट्रवादीत इनकमिंग; कोण कोण संपर्कात?, जयंतरावांनी सर्वच सांगितले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com