Bajrang Sonwane News : धनंजय मुंडेंनी 'औकात' काढली; बजरंग सोनवणेंनी परळीत जाऊन डिवचलं

Baajrange Sonwane On Munde : "आमच्या समर्थकांना जर कोणी धमकावीत असेल, तर...", असा इशाराही सोनवणे यांनी अप्रत्यक्षपणे मुंडे यांना दिला आहे.
Dhananjay Munde, Bajrang Sonwane
Dhananjay Munde, Bajrang SonwaneSarkarnama
Published on
Updated on

Beed News 3 May : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर देणे, ऊसतोड कामगार आणि कारखान्यातील कामगार यांच्या कामाचे पैसे देणे ही आमची औकात आहे, असं प्रत्युत्तर बीडचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीत जाऊन दिलं. ज्यांना वडिलांना उभे केलेले कारखाने चालविता आले नाहीत, ज्यांनी कामगार व शेतकऱ्यांचे पैसे बुडविले त्यांनी आमची औकात आणि लायकी काढणे म्हणजे चेष्टा आहे, असं बजरंग सोनवणे यांनी सुनावलं आहे.

बजरंग सोनवणे ( Bajrang Sonwane ) यांना राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांची ‘औकात काय’, जिल्ह्याची 'तकदीर' आणि 'तसबीर' याचा फैसला आम्ही करु, असं म्हणत सोनवणे यांच्यावर हल्लाबोल केला होता. याला बजरंग सोनवणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) आणि बजरंग सोनवणे यांच्यात बीड लोकसभा मतदारसंघात ( Beed Lok Sabha Election 2024 ) ‘कांटे की टक्कर’ होत आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी खुद्द धनंजय मुंडे आणि महायुतीचे नेते सभा, बैठका घेत आहेत. तर, बजरंग सोनवणे देखील रोज एक-दोन तालुक्यांचा दौरा करत आहेत. शुक्रवारी ( 3 मे ) बजरंग सोनवणे परळी मतदारसंघातील पिंपरी बु., गोवर्धन, हिवरा, जवळगव्हाण, कासारवाडी, पोहनेर, डिग्रस, तेलसुख, बोरखेड, ममदापूर, कौडगाव हुडा, कौडगाव घोडा, आचार्य टाकळी, कानडी, पिंपळगाव - गाडे आदी गावाच्या दौऱ्यावर आहेत.

Dhananjay Munde, Bajrang Sonwane
Dhananjay Munde: 'आपण मॅनेज नाही' असं समोरच्या उमेदवाराला...; मुंडेंचा सोनवणेंवर हल्लाबोल

बजरंग सोनवणे म्हणाले, "मी सामान्य शेतकरी कुटुंबातील शेतकरी पुत्र असून सुद्धा दोन दोन साखर कारखाने चालवली. ऊसाला मराठवाड्यात विक्रमी भाव देत आहे. ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि ऊसतोड मजूर यांचे पैसे आम्ही बुडवले नाहीत. तसेच, आमच्या समर्थकांना जर कोणी धमकावीत असेल, तर आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत."

"ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नसून उलट दोन्ही कारखाने दुप्पट क्षमतेने चालू आहेत. माझा जन्म कोणत्याही राजकारणाच्या पोटी झालेला नसताना सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलो. माझे आई-वडील शेतकरी असेल तरी मला राजकीय जन्म देणारे सामान्य नागरिक हे माझे राजकीय मायबाप आहेत. मागील दहा ते पंधरा वर्षां मध्ये जर भाजपने मतदारसंघाचा विकास केला असता, तर मग त्यांच्यावर आता ही वेळ आली नसती," असा टोला सोनवणे यांनी मुंडेंना लगावला आहे.

"मला विरोध करणाऱ्यांचाही ऊस गाळप केला. त्यामुळे ऊसासाठी कोणीही घाबरण्याचे कारण नाही. उलट देशाचे अर्थकारणाच्या गप्पा मारणाऱ्या भाजपच्या उमेदवाराने स्वत:च्या वडिलांनी उभारलेला व आशिया खंडात नावलौकिक असलेला वैद्यनाथ कारखाना बंद पाडला," असा टोमणा सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांना लगावला आहे.

( Edited By : Akshay Sabale )

Dhananjay Munde, Bajrang Sonwane
Dhananjay Munde : 'शिवसेनेचा काटा कसा काढायचा? गणेश चतुर्थीला दिल्लीत बैठक...' ; मुंडेंचा मोठा गौप्यस्फोट!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com