छत्रपती संभाजीनगर : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपुर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. या हत्येत सहभाग असल्याबद्दल संशयाची सुई राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे अत्यंत विश्वासू वाल्मिक कराड यांच्याभोवती फिरते आहे. दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड काल शरण आला. केज न्यायालयाने त्याला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, दोन दिवसाआधीच सरंपच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad High Court) फौजदारी याचिका दाखल करत धनंजय मुंडे यांना मंत्रीपदापासून दूर ठेवा, वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावा, अशी मागणी केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास नि:पक्षपणे व्हावा, चौकशी कुठल्याही दबावाशिवाय व्हावी, यासाठी मुंडे मंत्रीपदावर असणे योग्य ठरणार नाही, असे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहआरोपी करून वाल्मीक कराडवरही गुन्हा दाखल करावा. कराड याच्यावर मोक्काच्या कलमान्वये गुन्हा दाखल करावा. तर कराड हा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांचा निकटचा सहकारी असल्याने संतोष देशमुख हत्या प्रकरणात नि:पक्षपणे चौकशी होण्यासाठी धनंजय मुंडे यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे.
मस्साजोगचे हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय पंडितराव देशमुख यांनी ॲड. शौमितकुमार सोळंके यांच्या मार्फत क्रिमिनल रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार मंत्री धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांच्यातील मैत्रीचा दाखला देणारी सुमारे दीडशे छायाचित्रे समाजमाध्यमावर उपलब्ध आहेत. दोघांच्याही खात्यावर परस्परांशी संबंधित छायाचित्रे असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
याशिवाय धनंजय मुंडे व वाल्मीक कराडच्या संबंधांचे दाखले देणारी विधिमंडळातील भाषणे आधार म्हणून उपलब्ध असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास दबावाशिवाय आणि निष्पक्षपणे करायचा असेल तर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर ठेवावे, असे आदेश देण्याची विनंती करणारी याचिका खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.