Nanded District Bank : अशोक चव्हाणांच्या बंद पाकिटात मेहुण्याचे नाव; बॅंकेची सूत्रं खतगावकरांच्या हाती...

Ashok Chavan News : खतगावकर यांची जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवड झाली आहे.
Nanded District Bank News
Nanded District Bank NewsSarkarnama
Published on
Updated on

Congress Political News : नांदेड जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण कोणाला संधी देतात ? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. (Nanded Bank News) या निवडीसाठी शहरातील एका हाॅटेलमध्ये सर्व संचालकांची गुप्त बैठकही पार पडली होती. या बैठकीत अध्यक्ष निवडीच्यावेळी अध्यक्षपदासाठीचे नाव बंद पाकिटातून पाठवले जाईल, असे अशोक चव्हाणांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे नांदेड जिल्हा बॅंकेचा अध्यक्ष कोण होणार? याची उत्सुकता लागली होती.

Nanded District Bank News
Hingoli Congress Politics : हिंगोलीत काँग्रेस पक्षवाढीच्या बैठकीतच हाणामारी...

अखेर बंद पाकिटात अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपल्या पदाधिकाऱ्याचे किंवा कार्यकर्ता असलेल्या संचालकाचे नाही, तर आपले मेहुणे माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर यांचे नाव पाठवले होते. (Congress) आज झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खतगावकर यांची निवड करण्यात आली. आगामी लोकसभा निवडणूक पाहता खतगावकरांची निवड महत्त्वाची मानली जात आहे.

कालपर्यंत नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदसाठी‌ तीन नावांची चर्चा होती. उत्सुक असलेल्या संचालकांनी जोरदार फिल्डिंगही लावली. (Marathwada) पण ऐनवेळी पहिल्या तीन संचालकांना मागे टाकत भास्कर पाटील खतगावकर यांनी बाजी मारली. अध्यक्षपदी खतगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बंद पाकिटात भास्कर पाटील खतगावकर यांचे नाव पाठवल्याने सगळ्या संचालक मंडळाने त्याला संमती दर्शवली.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देगलूर बिलोली, नायगाव, मुखेड या भागात पक्षाची बाजू भक्कम व्हावी, यासाठी खतगावकरांची निवड करण्यात आल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे. खतगावकर यांची जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवड झाली आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यामुळे राजीनामा दिला होता. आज या पदासाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली.

अध्यक्षपदासाठी माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, गोविंदराव शिंदे नागेलीकर, बाळासाहेब रावनगावकर या तीन नावांची चर्चा होती. आज प्रत्यक्षात निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तेव्हा खतगावकरांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली. गेल्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना देगलूर बिलोली, मुखेड, नायगाव या भागात मोठा फटाका बसला होता.

Nanded District Bank News
Gulabrao Patil News :..मी हरलो तर तुमच्या घराजवळ फटाके फुटतील, असं गुलाबराव पाटील का म्हणाले?

आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींकडून येऊ शकतात, ही शक्यता गृहीत धरून अशोक चव्हाणांनी हालचाली सुरू केल्या आहेत. खतगावकर यांच्या हाती बॅंकेची सूत्रे सोपवणे हा त्याचाच एक भाग असल्याचे बोलले जाते. काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे यांची मात्र अध्यक्षपदाची संधी पुन्हा एकदा हुकली आहे. खतगावकर हे शेती व सहकार क्षेत्रातील जाणकार मानले जातात. तसेच एक मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निवडीने काॅंग्रेसला येणाऱ्या काळात फायदा होईल असे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com