Ambadas Danve : तनवाणींना उमेदवारी ही पक्षाची चूक; अंबादास दानवेंनी दिली कबुली

Aurangabad Central Assembly Election: किशनचंद तनवाणी यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाचे काम केले नाही, संघटनेत देखील त्यांचे काम नाही, असे आम्ही पक्षप्रमुखांना सांगितले होते. पण, त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
Amabadas Danve, Kishnchand Tanvani
Amabadas Danve, Kishnchand Tanvani Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhaji Nagar News: शिवसेना ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी ऐन विधानसभा निवडणुकीत पक्ष सोडून जात आहेत, पण जे कामाचे नाहीत तेच जात आहेत. किशनचंद तनवाणी लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रचारात नव्हते, संघटनेत देखील सक्रिय नव्हते, पण पक्षाने त्यांना ‘मध्य’ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. ती चूक होती, अशी कबुली शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी दिली.

पत्रकार परिषदेत दानवे (Ambadas Danve) म्हणाले, ‘किशनचंद तनवाणी यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाचे काम केले नाही, संघटनेत देखील त्यांचे काम नाही, असे आम्ही पक्षप्रमुखांना सांगितले होते. पण, त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. अर्धा तासात आम्ही दुसरा उमेदवार जाहीर केला आणि कामाला लागलो,’ असे शिवसेना (Shivsena) नेते दानवे यांनी स्पष्ट केले.

Amabadas Danve, Kishnchand Tanvani
Uddhav Thackeray : शिवसेनेची धुरा हातात आली अन् ठाकरे घरण्यातील पहिले 'CM' झाले

शहराच्या पाणीप्रश्‍नावरून अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. फडणवीस जाहीर सभेत खोटे बोलत आहेत, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला. शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिकेचा स्वःहिस्सा राज्य शासन देईल असा निर्णय उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना घेतला होता, पण त्यानंतरच्या सरकारने महापालिकेवर दीर्घ मुदतीच्या कर्जाचा बोजा टाकला.

Amabadas Danve, Kishnchand Tanvani
Uddhav Thackeray: धरण फोडणारा ‘तो’ खेकडा मध्ये घुसला अन्‌ दीपकआबांची उमेदवारी रद्द झाली; ठाकरेंचा सावंतांवर निशाणा

महापालिकेला या कर्जाच्या हप्त्यापोटी प्रत्येक महिन्यात २५ कोटी रुपये भरावे लागणार आहेत. महापालिकेला ते शक्य होणार नाही. तसेच, ४४ जलकुंभांची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. त्यामुळे तीन महिन्यांत पाणी कसे देणार, असा प्रश्‍न दानवे यांनी केला. शिंदे-फडणवीस यांना शहराची पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊ द्यायची नाही, असा आरोपही दानवे यांनी केला.

Amabadas Danve, Kishnchand Tanvani
Supriya Sule : टिंगरेंची नोटीस शरद पवारांनाच; सुळेंनी पत्रकार परिषदेत पुरावाच दिला

हिंमत असेल तर मैदानावर सभा घ्या..

भाजप नेत्यांना चौकात, रस्त्यावर सभा घ्याव्या लागत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा देखील रामनगर भागात ठेवण्यात आली आहे. हिंमत असेल तर त्यांनी सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेऊन दाखवावी, असे आव्हान अंबादास दानवे यांनी दिले. कुणाच्या सभेला किती गर्दी होईल, यावरून ताकद कळेल असे दानवेंनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सर्वच नऊ जागा महाविकास आघाडी जिंकणार असा दावाही दानवेंनी केला.

Amabadas Danve, Kishnchand Tanvani
Aditya Thackeray: गद्दारांना बर्फाच्या लादीवर बसवणार; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर मोठा हल्ला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com