Latur Congress News : काकांचा सल्ला ऐकला अन् अमित देशमुखांचे काँग्रेसमध्ये वजन वाढले...

Loksabha Election 2024 : अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रेवश केला होता. यावेळी दिलीपराव देशमुख यांनी आपल्या पुतण्यांना दिलेला सल्ला मोलाचा ठरला.
Diliprao Deshmukh, Amit, Dhiraj And Riteish Deshmukh
Diliprao Deshmukh, Amit, Dhiraj And Riteish DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Latur News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपची वाट धरली तेव्हा लातूरच्या देशमुखांचे नाव चर्चेत होते. वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी तर एकदा जाहीरपणे लातूरचे देशमुख कधीही भाजपच्या मांडीवर जाऊन बसतील असा दावा केला होता. पण दिवंगत विलासराव देशमुख यांच्यानंतर लातूर जिल्ह्यात काँग्रेसची धुरा आणि अमित, धीरज देशमुख या दोन पुतण्यांचे राजकारण काका माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.(Latur Loksabha Election 2024)

लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी लातूरात विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम झाला. यावेळी राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आवर्जून उपस्थित होते. अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रेवश केला होता. यावेळी दिलीपराव देशमुख यांनी आपल्या पुतण्यांना दिलेला सल्ला मोलाचा ठरला. संकटाच्या काळात आहे तिथे खंबीरपणे उभे राहा, न डगमगता लढा द्या, तुम्हाला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही, असे दिलीप देशमुख म्हणाले होते.

Diliprao Deshmukh, Amit, Dhiraj And Riteish Deshmukh
Congress News : बाजीराव खाडेंचे निलंबन, विशाल पाटलांचे लाड?; काँग्रेसमध्ये चाललंय काय?

अमित आणि धीरज या दोन्ही पुतण्यांनी काकांचा हा सल्ला गांभीर्याने घेतला आणि अमित देशमुख आज मराठवाड्यातील सर्वात मोठे काँग्रेस नेते म्हणून पुढे येत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसच्या (Congress) स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश असलेले अमित देशमुख यांनी महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी स्वतःला अक्षरश झोकून दिले आहे. भाऊ धिरज, आई वैशाली देशमुख आणि काका दिलीपराव यांचीही त्यांना खंबीर साथ मिळत आहे.

राज्यातील अनेक मतदारंसघामध्ये अमित देशमुख यांची सभा व्हावी यासाठी मागणी वाढत आहे. लातूर लोकसभेची जागा भाजपकडून खेचून आणण्यासाठी जिल्ह्यातील प्रचारासाठी अमित देशमुख हेलिकाॅप्टरचा वापर करत आहेत. राज्यातील काँग्रेसची झालेली पडझड रोखण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री तथा वक्तृत्व शैलीने अनेकांना घायाळ करणारे दिवंगत विलासराव देशमुख यांची शैली आत्मसात केलेले अमित देशमुख यांच्या सभांना राज्यभरातून मागणी होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कमी वेळात अधिकाधिक सभा घेता याव्यात यासाठी त्यांच्याकडून हेलिकाॅप्टरचा वापर केला जात आहे. मराठवाड्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), चाकूरकर यांचे मानसपुत्र समजले जाणारे माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर, चाकूरकर यांच्या स्नुषा अर्चना पाटील चाकूरकर यांनी काँग्रेसला सोडून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण प्रसंगी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, माजीमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचा Mahavikas Aaghadi Melava मेळावा पार पडला होता.

तेव्हा राज्यस्तरीय अनेक नेत्यांनी अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी राज्याचे नेतृत्व करावे, असे आवाहन केले होते. दिलीपराव देशमुख यांनीही जिथे आहात तिथे खंबीर उभे रहा, असे आवाहन पक्ष प्रवेशाच्या वावड्यांवर उत्तर देताना केले होते. विलासराव देशमुख राज्याचे नेतृत्व करत होते तेव्हा यांच्या महाराष्ट्रात सगळीकडे सभा व्हायच्या. त्याच धर्तीवर राज्यात आता अमित देशमुख यांच्या सभा होणार आहेत.

राज्याबरोबरच त्यांना लातूर जिल्हाही सांभाळावा लागणार आहे. अमित देशमुख यांनी जालना, अमरावती, नांदेड, सोलापूर, परभणी यासह इतर ठिकाणी सभा घेतल्या. राज्यातील दुसऱ्या टप्प्याचे मतदान 26 एप्रिल रोजी होत आहे. यात नांदेड, परभणी, हिंगोली या मराठवाड्यातील तीन लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या ठिकाणचा प्रचार आज थांबला असला तरी मराठवाड्यात 7 व 13 मे असे दोन टप्पे शिल्लक आहेत. त्यासाठी अमित देशमुख आणि त्यांचे हेलिकाॅप्टर सज्ज आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com