Kolapur Loksabha : कोल्हापूर आणि सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंड झाले आहे. कोल्हापूर मतदारसंघातून शाहू महाराजांना उमेदवारी दिलेली असताना अपक्ष म्हणून काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर सांगलीमध्ये महाविकास आघाडीतील ठाकरेंचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या विरोधात काँग्रेसचे विशाल पाटील अपक्ष लढत आहेत. बंड करणाऱ्यांविरोधात काँग्रेस कठोर कारवाई करण्याचे संकेत मिळत असताना बाजीराव खाडे यांचे सहा वर्षांसाठी काँग्रेसमधून निलंबत केले आहे, तर विशाल पाटील Vishal Patil यांच्याबाबत अजूनही निर्णय घेण्यात आला नाही.
बाजीराव खाडे हे 'टीम प्रियांका गांधी' यांच्यातील महत्त्वाचे नेते आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून Kolhapur Loksabha निवडणुकीची तयारी करून उमेदवारी न मिळाल्याने खाडे अपक्ष रिंगणात उतरले होते. मंगळवारी बाजीराव खाडे यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली होती. गेल्या 28 वर्षांपासून काँग्रेस पक्षात काम करत आहेत. आम्हाला उमेदवारी देऊ नका; पण किमान आमचा विचार तर करा. कामाचा आहे तोपर्यंत काम करून घ्यायचं अणि काम झाल्यानंतर वाच्यावर सोडून द्यायचे, याचा परिणाम म्हणूनच आपण निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे Congress बंडखोर उमेदवार बाजीराव खाडे यांनी सांगितले होते.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून बाजीराव खाडे यांनी गेल्या अडीच वर्षांपासून निवडणुकीची तयारी केली होती. या निवडणुकीत त्यांना विचारात घेतले नसल्याचा आरोप खाडे यांनी स्थानिक काँग्रेस नेत्यांवर केला होता. त्यातूनच त्यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरला आहे. अर्ज माघारीच्या दिवशी काँग्रेसच्या नेत्यांकडून त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न झाला. पण अर्ज माघारीची मुदत संपल्याने त्यांचा अर्ज कायम राहिला. दरम्यान, त्यांच्यावर काँग्रेसकडून कारवाई करण्यात आली.
(Edited By Roshan More)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.