Ashok Chavan On Nana Patole : अशोक चव्हाणांचा पटोलेंवर गंभीर आरोप, त्यांच्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले

Nanded Loksabha : महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत चव्हाण आणि लोकसभेचा काय संबंध आहे. ही नायगावच्या ग्रामपंचायत किंवा आत्ताच्या नगर परिषदेची निवडणूक नाही, असा टोला अशोक चव्हाण यांनी लगावला.
Nana Patole Ashok Chavan
Nana Patole Ashok Chavan sarkarnama

Maharashtra Politics : अशोक चव्हाण काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसमधील नेते त्यांच्यावर टीका करत आहेत. लोकसभेच्या प्रचारातदेखील अशोक चव्हाण यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांंना टार्गेट करत आहेत. नाना पटोलेंच्या टीकेला अशोक चव्हाणांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

'काल आमचे जुने मित्र नाना पटोले नांदेडात येऊन गेले. प्रचार सभेत बोलताना माझ्यावर त्यांनी टीका केली. म्हणाले, मी स्वार्थी म्हणून काँग्रेस सोडून गेलो. पण मला सांगायचं आता पोपटासारखं बोलणारे नाना पटोले हेच खरे बेजबाबदार, बेभरवशाचे आहेत. आम्ही त्यांना विधानसभेचे अध्यक्ष केले पण कुणाला न विचारता मंत्री व्हायचे म्हणून राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिला म्हणून महाविकास आघाडीचे MahaVikas Aghadi सरकार पडले', अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी नाना पटोले यांच्यावर तोफ डागली.

Nana Patole Ashok Chavan
Maharashtra Politics : भाजप नेत्याचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'तीन महिन्यांपूर्वीच उद्धव ठाकरेंना भाजपसोबत...'

महायुतीचे लोकसभेच्या नांदेड मतदारसंघाचे Nanded Loksabha उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भोकरमध्ये सभा झाली. या सभेत अशोक चव्हाण Ashok Chavan यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. मला स्वार्थी म्हणणारे पटोले खऱ्या अर्थाने बेजबादार, बेभरवशाचे नेते आहे. मंत्रीपदासाठी त्यांनी आम्ही त्यांना तीन पक्षांनी मिळून केलेले विधानसभा अध्यक्ष पद सोडले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विशेष म्हणजे कोणाला न विचारता त्यांनी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीचे राज्यातील सरकार पडले होते, असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला. महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत चव्हाण आणि लोकसभेचा काय संबंध आहे. ही नायगावच्या ग्रामपंचायत किंवा आत्ताच्या नगर परिषदेची निवडणूक नाही. संसदेत हिंदी, इंग्रजी बोलावं लागतं. चव्हाणांना या भाषा येतात का? मी खासदार म्हणून संसदेचे कामकाज प्रत्यक्ष पाहिले आहे, अनुभवले आहे, त्यात सहभाग घेतला आहे.

त्यामुळे वसंत चव्हाण यांच्यासारख्या लोकांना संसदेत पाठवून काय उपयोग होणार आहे. प्रताप पाटील चिखलीकर आता तरबेज झाले आहेत. त्यांना हिंदी, इंग्रजी सगळ्या भाषा समजतात. त्यामुळे मोदीजींच्या चारसौ पारमध्ये चिखलीकरांचा नंबर वरचा असला पाहिजे, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले. वसंत चव्हाण, महाविकास आघाडीकडे विकासाचा काय अजेंडा आहे? तर काही नाही, त्यांचा अजेंडा फक्त अशोक चव्हाण हाच आहे, असा टोला चव्हाण यांनी लगावला.

(Edited By Roshan More)

R

Nana Patole Ashok Chavan
Srirang Barne Wealth : 'मावळ'मधील महायुतीचे दहावी पास उमेदवार बारणे अब्जाधीश!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com