Latur DCC Bank : 'हम पाँच ही काफी है', लातूर जिल्हा बँकेवर आम्ही अंकूश ठेवणार; काकींचा पराभव करून बँकेत एन्ट्री करताच सत्ताधाऱ्यांना थेट इशारा!

Latur DCC Bank election News : भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्या पत्नी शोभा पवार या बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यांच्या जागेवर काँग्रेस आणि भाजपच्या आघाडीने दावा सांगितला आहे. त्यामुळे हे संचालक नेमके कोणाचे? हा प्रश्न कायम आहे.
arvind patil-nilngekar
arvind patil-nilngekar Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada Politics : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. देशमुख कुटुंबाच्या नेतृत्वाखाली बँकेचा कारभार गेल्या अनेक वर्षापासून पाहणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीने 19 पैकी 14 जागा जिंकत बाजी मारली आहे. भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्या पत्नी शोभा पवार या बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यांच्या जागेवर काँग्रेस आणि भाजपच्या आघाडीने दावा सांगितला आहे. त्यामुळे हे संचालक नेमके कोणाचे? हा प्रश्न कायम आहे.

दुसरीकडे भाजपच्या (BJP) छत्रपती शिवाजी महाराज परिवर्तन पॅनलकडून विजयी झालेले अरविंद पाटील निलंगेकर यांनी महायुतीचे पाच संचालक निवडून आल्याचा दावा करत आम्ही पाच जण काँग्रेसच्या भ्रष्ट कारभारावर अंकूश ठेवण्यासाठी पुरेसे आहोत, असा इशारा दिला आहे. एक हजार मतदारांपैकी साडेआठशे मतदान हे काँग्रेसच्या पॅनलकडे असताना आम्ही पाच संचालक निवडून आलो आहोत, यावरून मतदार परिवर्तनाच्या बाजूनेच होते, हे स्पष्ट होते.

तरीही मतदारांचा कौल मान्य करत आम्ही पुढील पाच वर्ष जिल्हा बँकेतीला काँग्रेसच्या भ्रष्ट कारभारावर लक्ष ठेवून शेतकरी हिताचे निर्णय घ्यायला सत्ताधाऱ्यांना भाग पाडू, असेही अरविंद पाटील निलंगेकर म्हणाले. महायुतीच्या निवडून आलेल्या संचालकांचे अभिनंदन करताना आमचा बराच वेळ हा न्यायालयीन लढाईत गेला. आमचे अर्ज बाद करण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे कोर्टात धाव घ्यावी लागली. पण शेवटी विजय सत्याचा झाला आणि आज जिल्हा बँकेत आम्ही शून्य होतो, आता पाच जण आलो आहोत, असे निलंगेकर म्हणाले.

arvind patil-nilngekar
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नेत्यांना नेमका काय फायदा होतो? निवडणुकीपासून सत्तेपर्यंतचं गणित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्यासाठी बळ दिले, आमच्या सारख्या तरूण कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवला, त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. काँग्रेसकडून विजयाचा जल्लोष साजरा केला जात असला तरी त्यांना या निवडणुकीत पैशाचा वापर करावा लागला. जे याआधी बँकेचे अध्यक्ष होते, त्यांना घरातलीच मते पडली आणि त्यावर ते विजयी झाले, त्यामुळे खरतर त्यांनी जल्लोष करण्याचे काहीच कारण नाही, असा टोलाही अरविंद पाटील निलंगेकर यांनी विजयानंतर प्रतिक्रिया देताना लगावला.

arvind patil-nilngekar
Latur DCC Bank : लातूर जिल्हा बँकेत परिवर्तन नाहीच, काँग्रेस आघाडीच्या सहकार पॅनलने बाजी मारली; धीरज देशमुख, अरविंद पाटील निलंगेकर विजय!

आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji patil nilngekar) यांनीही परिवर्तन पॅनलच्या विजयी झालेल्या संचालकांचे अभिनंदन केले. आमचे मार्गदर्शक मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी युवकांवर विश्वास ठेवून अत्यंत भक्कम साथ आम्हाला दिली. त्यामुळे आमचा हा विजय आम्ही त्यांना समर्पित करतो. तसेच आमच्यावर विश्वास ठेवलेल्या प्रत्येक शेतकरी, कष्टकरी व सभासद बांधवांचा हा विजय आहे. या सर्वांना हा विजय समर्पित करतो आणि जिल्हा बँकेत नवे परिवर्तन घडवून दाखवण्याचा विश्वास सर्वांना देतो, अशी ग्वाही निलंगेकर यांनी या निमित्ताने दिली.

arvind patil-nilngekar
Latur DCC Bank Election Results : लातूर जिल्हा बँकेवर पुन्हा देशमुखांचीच सत्ता; निलंगेकरांच्या पॅनलचा पराभव

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.