Latur Election: लातूरमध्ये दुरंगी-तिरंगी लढती रंगणार! 70 जागांसाठी साडेतीनशेहून अधिक उमेदवार रिंगणात

लातूर महापालिका निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सगळ्याच राजकीय पक्षांची भागमभाग झाली.
Latur Municipal Corporation News
Latur Municipal Corporation NewsSarkarnama
Published on
Updated on

Latur News: लातूर महापालिका निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सगळ्याच राजकीय पक्षांची भागमभाग झाली. बंडखोरांना थंड करण्यासाठी साम-दाम दंड भेद अशा सगळ्यांचा वापर करण्यात आला. तरीही पूर्णपणे बंडखोरी रोखण्यात प्रमुख राजकीय पक्ष अपयशी ठरले आहेत. याचा सर्वाधिक फटका भाजपला बसल्याचे दिसून आले आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी लातूर महापालिकेत काही प्रभागांमध्ये दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढत होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Latur Municipal Corporation News
Top 10 News: भाजपला निष्ठावंतांचा असाही दणका ते बजरंग बाप्पांना हेलिकॉप्टरमधून लिफ्ट

महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 627 पैकी 268 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे 359 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. येथे काही प्रभागांत काँग्रेस, भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस अशी तिरंगी तर काही प्रभागांत काँग्रेस व भारतीय जनता पक्षात दुरंगी लढत होणार आहे.

Latur Municipal Corporation News
Latur Election: भाजपला निष्ठावंतांचा असाही दणका! 28 जणांनी कायम ठेवली अपक्ष उमेदवारी

महापालिकेच्या 18 प्रभागांतील 70 जागांसाठी निवडणूक होत आहे. यासाठी 759 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननी नंतर 627 अर्ज वैध ठरले होते. अर्ज माघारीसाठी दोन दिवस होते. गुरुवारी उमेदवारांनी तर आज अखेरच्या दिवशी आता 359 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.

Latur Municipal Corporation News
राजभवनातून थेट शेतात! राज्यपालांनी हाती धरला नांगर, ज्वारीची पेरणी अन्...

एकाच दिवशी 240 जणांची माघार

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 240 उमेवदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. यात प्रभाग एकमधून 21, प्रभाग दोन- 14, प्रभाग तीन- 25, प्रभाग चार- 11, प्रभाग पाच- 9, प्रभाग सहा- 15, प्रभाग सात- 6, प्रभाग आठ- १ 10, प्रभाग नऊ- 10, प्रभाग दहा- 10, प्रभाग अकरा- 14, प्रभाग बारा- 8, प्रभाग तेरा- 10, प्रभाग चौदा- 19, प्रभाग पंधरा- 25, प्रभाग सोळा- 20, प्रभाग सतरा- 7, प्रभाग अठरामधून 8 उमेदवारांचा समावेश आहे.

Latur Municipal Corporation News
Mumbai High Court: मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय! अपघातग्रस्ताच्या कुटुंबियांना १.३ कोटींची नुकसान भरपाई; हेल्मेट नसल्याचा दावा फेटाळला

शोधाशोध, धावाधाव

येथे सर्वच प्रभागांत उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज भरले होते. यात अपक्षांसोबतच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची संख्या लक्षणीय होती. त्यामुळे राजकीय पक्षांचे अधिकृत उमेदवार अडचणीत आले होते. त्यामुळे राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी सकाळपासूनच अशा उमेदवारांवर लक्ष ठेवून होते. अनेकांचे मोबाइल लागत नसल्याने धाकधूकही वाढत होती. उमेदवारांचा शोध घेण्यात येत होता. पक्षाच्या नेत्यांना बोलणे करून देऊन आश्वासनेही घेण्यात येत होती.

उमेदवारांना दुपारी तीनपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्यासमोर उभे करण्यासाठी अधिकृत उमेदवारांची दिवसभर धावाधाव सुरू होती. यात अनेकांना अर्ज मागे घेण्यात राजकीय पक्षांना यश आले असले तरी काहींनी मात्र बंडखोरी केली आहे. याचा फटका कोणाला बसणार हे निवडणुकीनंतरच कळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com