Mumbai High Court: मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय! अपघातग्रस्ताच्या कुटुंबियांना १.३ कोटींची नुकसान भरपाई; हेल्मेट नसल्याचा दावा फेटाळला

Mumbai High Court: मुंबई हायकोर्टानं नुकताच एक मोठा निर्णय दिला आहे. या निर्णयाची बरीच चर्चा सुरु असून यामध्ये अपघातग्रस्त व्यक्तीला तब्बल कोट्यवधी रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे.
Bombay High Court notice to MLAs MPs
Bombay High Court notice to MLAs MPsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai High Court: मुंबई हायकोर्टानं नुकताच एक मोठा निर्णय दिला आहे. या निर्णयाची बरीच चर्चा सुरु असून यामध्ये अपघातग्रस्त व्यक्तीला तब्बल १.३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. विशेष म्हणजे अपघातावेळी संबंधित पीडित व्यक्तीनं डोक्यात हल्मेट घातलं नव्हतं, हा युक्तीवादही हायकोर्टानं फेटाळून लावला आहे.

Bombay High Court notice to MLAs MPs
Shivsena-MNS Manifesto: शिवसेना-मनसेचा वचननामा आला समोर! शहर वाचवण्याचं आवाहन, मुंबईकरांसाठी मांडले 'हे' महत्वाचे मुद्दे

याप्रकरणात यापूर्वी मोटार अपघात दावा न्यायाधिकरण अर्थात मॅटनं अपघातात पीडित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानं त्याच्या कुटुंबाला १.३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरोधात हायकोर्टात अपील करण्यात आलं होतं. पण हायकोर्टानं हे अपील फेटाळून लावत मॅटचा आदेश कायम ठेवला. यामुळं पीडित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

हायकोर्टात काय घडलं?

रस्ता अपघाताचा शिकार बनलेल्या एका कुटुंबाला १.३ कोटी रुपायांची नुकसान भरपाई देण्याचा कनिष्ठ कोर्टाचा आदेश हायकोर्टानं कायम ठेवला. यामध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तीनं हेल्मेट घातलं नव्हतं हा दावा विरोधी पक्षाकडून करण्यात आला होता, पण तो हायकोर्टानं फेटाळून लावला. अपघातग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांकडून हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टानं म्हटलं की, हेल्मेट न घालणं हा नुकसान भरपाई कमी करण्याचा आधार बनू शकत नाही. कारण मुख्य चूक दुसऱ्या वाहन चालकाची होती. त्यामुळं हा मोठा अपघात घडला.

Bombay High Court notice to MLAs MPs
Devendra Fadnavis: मराठी साहित्य संमेलनाच्या स्टेजवरही फडणवीसांचं लक्ष निवडणुकीकडं! व्यासपीठावरुन स्वतःच दिली जाहीर कबुली

प्रकरण नेमकं काय?

हे प्रकरण २०१८ मधील असून ठाणे जिल्ह्यात हा रस्ता अपघात झाला होता. यामध्ये एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. आपला निकाल देताना हायकोर्टानं विमा कंपनी आणि अपघाताला कारणीभूत ठरुन दुचाकी चालकाच्या मृत्यूलाही कारणीभूत ठरलेल्या दुसऱ्या वाहनचालकाच्या मालकाला संयुक्त स्वरुपात आणि वेगवेगळ्या स्वरुपात भरपाई देण्याचा आदेश दिला होता. ही भरपाईची एकूण रक्कम तब्बल १.३ कोटी रुपये होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com