Eknath Shinde's grand welcome : उपमुख्यमंत्री शिंदेंचं कोल्हापुरात ग्रँड वेलकम; आबिटकरांनी जाण ठेवत, स्वागतात सोडली नाही कुठलीच कसर!

Prakash Abitkar Kolhapur : जवळपास १० किलोमीटर परिसरात भगवे झेंडे, २१ फुटी फुलांचा हार, ८० जेसीबीच्या साहाय्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने केलेली फुलांची उधळण.
Eknath Shinde welcome
Eknath Shinde welcomesarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde Kolhapur visit: मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्री पदासाठी लागलेल्या स्पर्धेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला शब्द पूर्ण करत प्रकाश आबिटकर यांना सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री बनवले. तर एकनाथ शिंदेंनी दिलेल्या संधीची जाणीव ठेवत आज(शनिवार) पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूरात ग्रँड वेलकम केले.

कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीचा महाविजय झाला आहे. त्याला शोभेल असे स्वागत झाल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) देखील भारावून गेले. जवळपास १० किलोमीटर परिसरात भगवे झेंडे, २१ फुटी फुलांचा हार, ८० जेसीबीच्या साहाय्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने केलेली फुलांची उधळण या सर्व गोष्टींनी केलेल्या स्वागतामुळे उपमुख्यमंत्री शिंदे देखील चांगलेच आनंदी झाल्याचे दिसून आले.

Eknath Shinde welcome
Sanjay Raut on MNS : ''...त्यासाठी निर्णय घेणाऱ्यांच्या अन् धोरणकर्त्यांच्या कानाखाली आवाज काढावा लागतो'' ; संजय राऊतांचा 'मनसे'ला टोला!

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी विधानसभा मतदारसंघात आज शिवसेनेकडून महायुतीचा महाविजय साजरा केला गेला. कोल्हापूर जिल्ह्याने शिवसेनेला दिलेल्या भरभरून यशामुळे आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत सरवडे येथे आभार यात्रा आयोजित करण्यात आली होती. यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर(Prakash Abitkar) यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे केलेल्या स्वागतामुळे उपस्थित शिवसैनिकांच्या डोळ्याचे अक्षरशा पारणे फिटले. गेल्या अनेक विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्याने शिवसेनेला भरभरून दिले असताना देखील शिवसेनेच्या वाट्याला कधीच मंत्रिपद आले नव्हते. याची खदखद आजपर्यंत सर्वच आमदार आणि खासदारांना होती.

मात्र अडीच वर्षांपूर्वी घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर आणि बदलेल्या राजकीय समीकरणामुळे एकनाथ शिंदे यांनी उठाव केला. उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे व त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचे भवितव्य अंधारात असल्याचं बोललं जात होतं. मात्र तरी देखील या विधानसभा निवडणुकीत आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात केलेल्या कामाच्या जोरावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवले. दरम्यान विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी आलेल्या एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आबीटकर यांना आमदार करा, मी नामदार करतो, असा शब्द देत राधानगरी- भुदरगड विधानसभा मतदार संघातील जनतेला वचन दिले होते.

Eknath Shinde welcome
Bacchu Kadu news : बच्चू कडूंचा 'आवाज' विधिमंडळात पुन्ह घुमणार? प्रहारची रणनीती ठरली, तयारी सुरु!

राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्यात शिवसेनेला एक जागा मिळाली. मात्र या स्पर्धेत शिवसेनेकडे(Shivsena) पाच आमदार असल्याने त्या मंत्रिपदावर कोणाची वर्णी लागणार? याची चर्चा सुरू होती. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर दोघे देखील मंत्रिपदासाठी इच्छुक होते. परंतु एकनाथ शिंदे यांनी आबिटकर यांची निवड करत, मतदार संघातील जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच शिवसेनेला मंत्रिपद मिळाल्याचा आनंद शिवसैनिकांसह आबिटकर यांनाही प्रचंड झाला. इतकेच नव्हे तर जिल्ह्यात पहिल्यांदा, मतदार संघात पहिल्यांदाच मंत्रिपद दिल्या गेल्याचाही आनंद आबिटकर यांच्या चेहऱ्यावर आजही आहे.

पण मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यात देखील स्पर्धा लागली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आबिटकर यांच्यात या पदावरून स्पर्धा सुरू झाली. मुश्रीफ यांनी या पदावर दावा केला होता. पण एकनाथ शिंदे यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत आबिटकर यांना कोल्हापूरचे पालकमंत्री पदही दिले. आबिटकर यांच्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पुन्हा आपले सर्वस्व पणाला लावले होते. शिवसेना फुटीनंतर आबिटकर ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंच्या पाठिशी थांबले, त्याच पद्धतीने विधानसभा निवडणूक, मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्री पदाच्या निवडीत शिंदे हे आबिटकर यांच्या पाठिशी थांबले.

Eknath Shinde welcome
MNS on Godavari Pollution : नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा 'तो' संदेश मनसैनिकांनी घेतला मनावर!

प्रत्येक घडामोडीत शिंदे हे आबिटकर यांच्या मागे राहिल्याने आबिटकर यांनी आज त्याची जाण ठेवत उपमुख्यमंत्री शिंदे यांचे ग्रँड वेलकम केले. सायंकाळी पाच वाजता उपमुख्यमंत्री शिंदे यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन होताच, शिंदे हे राधानगरीत हेलिकॉप्टर मधून बिद्री येथे आले. तिथून ते श्री संत सद्गुरु बाळूमामा यांच्या दर्शनासाठी आदमापुरात गेले. महिलांच्यावतीने त्यांना औक्षण करण्यात आलं. तर आदमापुर ते सरवडे या मार्गावर दोन्ही बाजूला भगव्या झेंड्यांची कमानी लावण्यात आल्या होत्या. तर सभेच्या ठिकाणी मराठमोळ्या लेझीम पथकाने शिंदे यांचे स्वागत केले. तेवढ्यावरच न थांबता क्रेनच्या सहाय्याने 21 फुटांचा पुष्पहार शिंदे यांना घालण्यात आला. पुढे त्यांच्या मार्गावर दोन्ही बाजूला ऐंशी पेक्षाही अधिक जेसीबीमधून फुलांची उधळण करण्यात आली. इतक्या मोठ्या स्वागताने शिंदे देखील भारावून गेले.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com