Latur ZP election results : श्वास रोखणारा निकाल! जावा-जावांच्या लढाईत काँग्रेसचा दोन मतांनी डंका

Latur ZP Election: Congress Asha Bhise Defeats BJP Sarita Bhise by Just 2 Votes in Kamkheda : लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत कामखेड गटात काँग्रेस-भाजप यांच्याकडून लढणाऱ्या जावांमध्ये कोण जिंकलं याची उत्सुकता संपली आहे.
Latur ZP election results
Latur ZP election resultsSarkarnama
Published on
Updated on

Congress vs BJP Latur : लातूर जिल्हा परिषदेमध्ये भाजप महायुतीची सत्तेकडे वाटचाल सुरू आहे. भाजप, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे शिवसेना मिळून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पण या लढतीत, लातूरच्या कामखेडा जिल्हा परिषद गटात लढत लक्षवेधून घेणारी ठरली. इथं जावा-जावांच्या लढतीत, कोणी विजयाचा गुलाल उधळला, याकडे सर्वांचे लक्ष होत. कामखेडा जिल्हा परिषद गटात काँग्रेसने अवघ्या दोन मतांनी भाजपवर विजय मिळवला. या निकालाची राज्यभरात चर्चा होत आहे.

लातूर जिल्हा परिषदेच्या कामखेडा गटात काँग्रेसच्या आशा भिसे विजयी, भाजपच्या (BJP) सरिता भिसे यांचा केवळ 2 मतांनी केला पराभव केला. या गटाखाली असलेल्या पंचायत समिती गणात काँग्रेसचे उद्धवराव जाधव विजयी झाले आहेत. कामखेडा जिल्हा परिषद गट दोन्ही जावाजावा आमने-सामने होत्या.

धाराशिव जिल्ह्यातील ढोकी जिल्हा परिषद गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे उमेदवार अमस समुद्रे यांनी केवळ एक मतानी विजय मिळवला. शिवसेना ठाकरे सेना पक्षाच्या या विजयाची राज्यात चर्चा होत असतानाच, लातूर (Latur) इथल्या कामखेडा गटात जावा-जावांच्या लढतीची आणि त्यात कोण विजय झाला याची चर्चा होत आहे.

Latur ZP election results
Tanaji Sawant Nephew Victory : काकाला आस्मान दाखवलं! पुतण्या धनंजय ठरला 'धुरंधर', माजी मंत्री सावंतांच्या बालेकिल्ल्यावर थेट धडक

आशा भिसे या काँग्रेसकडून लढत असताना, त्यांची जाव सरिता भिसे या भाजपकडून लढत होत्या. या दोघींमध्ये चुरशीची लढत झाली. शेवटच्या फेरीपर्यंत कोण जिंकणार याची उत्सुकता होती. यात काँग्रेसच्या आशा भिसे यांनी बाजी मारली. दोन मतांनी त्यांचा विजय झाला. काँग्रेसच्या गोठ्यात या विजयामुळे आनंद असला, तरी जिल्हा परिषदेत भाजप-एकनाथ शिंदे शिवसेना-अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे.

Latur ZP election results
Sharad Pawar Health update : शरद पवार यांची तब्येत बिघडली; रुबी हॉल रुग्णालयात घेणार उपचार

महायुती सत्ता स्थापन करणार

लातूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये 59 जागांपैकी 57 जागांचे निकाल हाती आले आहेत. यात भाजपला 18, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला 11 आणि एकनाथ शिंदे शिवसेनेला एका जागेवर यश मिळालं आहे. बहुमतासाठी लागणारा 30 जागांचा आकडा महायुतीला मिळाला आहे. बहुमत गाठल्यामुळे लातूर जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता जवळपास निश्चित आहे.

मनसेनं खातं खोललं

लातूर जिल्हा परिषदेत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेने देखील आपलं खातं खोललं आहे. रेणापूर तालुक्यातील पानगाव इथून मनसेचे प्रदेश सचिव संतोष नागरगोजे यांचे बंधू डॉ. सुनील नागरगोजे विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला एक जागा मिळाली आहे, याशिवाय दोन अपक्ष ही निवडून आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com