

Dharashiv politics latest : एकनाथ शिंदे शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंडखोर पुतणे धनंजय सावंत यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकत, मोठे-मोठे गार केले गंमती मधी, असा सूचक इशारा दिला.
धनंजय यांनी काकांच्याच बालेकिल्ल्यात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत विजयाचा गुलाल उधळला. धनंजय सावंत यांनी 2443 मतांनी विजयी झाले आहे. शिवसेना ठाकरे सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि काका माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचे आव्हान असताना धनंजय जाधव यांनी यश मिळवलं.
शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा परंडा हा बालेकिल्ला मानला जातो. धनंजय सावंत यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यातून धनंजय सावंत अन् तानाजी सावंत काका-पुतण्यात, वादाची ठिणगी पडली. यानंतर धनंजय सावंत यांनी बंडखोरी करत, अपक्ष उमेदवारी जाहीर केली. धनंजय सावंत यांनी निजाम जवळा गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली.
पुतण्या धनंजय सावंत यांनीच काका तानाजी सावंत यांना, आव्हान दिले. यामुळे तानाजी सावंत यांची प्रतिष्ठपणाला लागली होती. तानाजी सावंत यांनी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. यातच शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष यांचे आव्हान होते. शिवसेना ठाकरे सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः निवडणुकीत लक्ष घातले होते.
खासदार निंबाळकर आणि काका आमदार तानाजी सावंत यांचे आव्हान धनंजय सावंत यांच्यासमोर होते. निंबाळकरविरुद्ध सावंत अशी लढाई सुरू असतानाच, धनंजय सावंत यांनी आपला विजय पक्का केला अन् जवळामध्ये धुरंधर ठरले. खासदार निंबाळकर आणि काका माजी मंत्री सावंत यांचा पराभव करून धनंजय सावंत विजयी झाले.
धनंजय सावंत यांनी काका तानाजी सावंत यांच्याकडे एकनाथ शिंदे शिवसेनेकडून तिकीट मिळेल, अशी अपेक्षा केली होती. धनंजय सावंत यांच्यासह त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना देखील उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या धनंजय सावंत यांनी काकांच्या विरोधात बंड पुकारलं. कार्यकर्त्यांची गरज संपली की चप्पल सारखं सोडून नेता पुढे जातो, माझी गरज संपली म्हणून मला 10 महिन्यांपासून बोलावलं नव्हतं, असं म्हणत धनंजय सावंत यांनी काकांच्या विरोधात आपली नाराजी बोलून दाखवली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.