
Solapur, 07 March : विधान परिषदेच्या रिक्त पाच जागांवर वर्णी लागावी, यासाठी सत्ताधारी महायुतीमधील नेते जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. विशेषतः भाजपकडे तीन जागा असल्यामुळे इच्छुकांची गर्दीही मोठी आहे. मराठवाड्याच्या राजकारणातील एक मोठे नाव आणि औस्याचे माजी आमदार, माजी मंत्री बसवराज पाटील हेही विधान परिषदेसाठी इच्छूक आहेत, त्यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे एकेकाळचे ओएसडी आणि सध्याचे औस्याचे आमदार अभिमान्यू पवार यांनी सूत्रे हलविण्यास सुरुवात केली आहे. सोलापूरचे लिंगायत समाजाचे नेते तथा पाच वेळा निवडून आलेले आमदार विजयकुमार देशमुख यांनाही पवारांनी सोबत घेत सामाजिक समीकरणही साधण्याचा प्रयत्न केला आहे.
विधान परिषदेच्या (Legislative Council) पाच जागांसाठी येत्या 27 मार्चला मतदान होत आहे. विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याने आमश्या पाडवी, रमेश कराड, राजेश विटेकर, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या पाच रिक्त जागांपैकी तीन जागा ह्या भाजपच्या असून एक राष्ट्रवादी आणि एक शिवसेनेची आहे, त्यामुळे भाजपकडे सर्वाधिक इच्छूक आहेत.
सत्ताधारी भाजपकडे सर्वाधिक तीन जागा असल्याने इच्छुकांची संख्याही त्यांच्याकडे मोठी आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात दाखल झालेले माजी मंत्री बसवराज पाटील (Basavraj Patil) हेही इच्छुक आहेत. भाजपमध्ये त्यांचे राजकीय पुनर्वसन कशा पद्धतीने होणार, याची उत्सुकता असतानाच विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झालेल्या आहेत.
खरं तर बसवराज पाटील हे औशाचे आमदार अभिमान्यू पवार यांचे कट्टर विरोधक त्यांनी एकमेकांच्या विरोधात 2019 ची एक निवडणूक लढवलेली आहे. त्या निवडणुकीत पवार यांनी बसवराज पाटील यांचा पराभव केला होता. तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच पाटील यांनी कमळ हाती घेतले. आता तेच अभिमान्यू पवार यांनी बसवराज पाटील यांच्या आमदारकीसाठी चक्रे फिरविण्यास सुरुवात केली आहे.
बसवराज पाटील यांचा आज वाढदिवस असून त्यानिमित्ताने सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख, अभिमान्यू पवार यांच्यासोबत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. आमदार पवार हे फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. पवार यांनी राजकारणात यावे, असा मुख्यमंत्री फडणवीसांचा आग्रह होता. त्यातूनच आमदार पवार हे सलग दुसऱ्यांदा औशातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. फडणवीसांचे ओएसडी म्हणून काम केलेले पवार यांनीच आता बसवराज पाटील यांना आमदार करण्याचे शिवधनुष्य हाती घेतले आहे.
बसवराज पाटील हे लिंगायत समाजातील मोठे नेते असून लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसवराज पाटील यांना रमेश कराड यांच्या जागी संधी मिळाल्यास भाजपसाठी तो बूस्टर डोस ठरू शकतो. तसेच, फडणवीसांना भेटायला जाताना बरोबर असलेले सोलापूरचे विजयकुमार देशमुखही लिंगायत समाजातील बडे प्रस्थ मानले जातात, त्यामुळे बसवराज पाटील यांच्या आमदारकीसाठी फडणवीसांचे निकटवर्तीय अभिमान्यू पवार आणि लिंगायत समाजातील देशमुख यांची फिल्डिंग महत्वूपर्ण ठरणार आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.