Manoj Jarange Patil News : "जास्त नाटके करू नका," जरांगे-पाटलांचा पंकजा मुंडेंना इशारा

Manoj Jarange Patil Latest News : "मराठे एकत्र नसताना अन्याय सहन केला. आता आम्ही सहन करणार नाही," असंही जरांगे-पाटलांनी म्हटलं आहे.
pankaja munde Manoj Jarange Patil
pankaja munde Manoj Jarange Patilsarkarnama

Beed News, 12 May : मी पंकजा मुंडे यांना पाडा, असं सांगितलं नाही. मी पाडा असं सांगितलं, तर ओबीसी मतदान सुद्धा मुंडेंच्या विरोधात जाईल. त्यामुळे जास्त नाटके करू नका. भाजप ( Bjp ) आणि महायुतीला पाडून महाविकास आघाडीला निवडून आणा, असं मी बोललोच नाही. फक्त मराठ्यांनी एक गठ्ठा मतदान करायचं आणि असं पाडायचं की पाच पिढ्या नंतर निवडणुकीला कुणी उभं राहिलं नाही पाहिजे, असं विधान मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील यांनी केलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

"एवढे दिवस तुम्हाला राजगादीवर बसवलं. मराठ्यांनी मतदान केलं. आता असे बोलून मराठ्यांचे उपकार फेडत आहात का? भाजपच्या व्यासपीठावर बसणाऱ्या मराठ्यांच्या नेत्याला लाज वाटली पाहिजे. मराठ्यांच्या नेत्यांसमोर जातीचा अपमान होतोय. कशाला मराठ्यांनी भाजपच्या व्यासपीठावर बसलं पाहिजे. आम्ही विरोधक नसून आम्हाला विरोध मानलं जातंय. बीडमधील कुठल्या ठिकाणी पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) किंवा भाजपला पाडा असं सांगितलं? आता असं बोलून उपकार फेडत आहात का? यांना कसं मराठ्यांनी निवडून द्यायचं," असा संतप्त सवाल जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) यांनी उपस्थित केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"दुसऱ्यांसाठी जातीच्या विरोधात जाऊ नका हे बीड आणि महाराष्ट्रातील मराठ्यांच्या नेत्यांना सांगतो. अन्यथा तुमच्यावर भयानक वेळ येईल. तुमच्या डोळ्यासमोर जातीचा अपमान सहन करू नका," असंही जरांगे-पाटलांनी म्हटलं.

pankaja munde Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil News : लोकसभेनंतर जरांगे पाटील उडवणार धुरळा; तब्बल 900 एकरांवर सभा, 500 खाटांचे रुग्णालय...

"तसेच, निवडणूक झाल्यावर बघून घेईल, अशी धमकी देण्याची गरज नाही. एकट्या बीडमध्ये साडे सहा लाख आणि महाराष्ट्रात सहा कोटी मराठे आहेत. मराठे एकत्र नसताना अन्याय सहन केला. आता आम्ही सहन करणार नाही. आम्ही कुणाला पाय लावला नाही. आम्हाला कुणी अजिबात पाय लावायचा नाही," असा इशारा जरांगे-पाटलांनी दिला आहे.

pankaja munde Manoj Jarange Patil
Manoj Jarange News : जरांगेंच्या रडारवर चंद्रकांतदादा पाटील, आता बघतोच कसा आमदार होतोय...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com