Lok Sabha Election News : लोकसभा नको रे बाबा! काळे-चव्हाणांनी हात जोडले…

NCP Marathwada News : आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा होती. पण त्यांनी नेत्यांच्या आग्रहानंतरही नकार दिल्याचे समजते.
MLA Satish Chavan, MLA Vikram Kale
MLA Satish Chavan, MLA Vikram KaleSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : महायुतीतील जागावाटप आणि त्यावरून सुरू असलेले नाट्य याची राज्यात खमंग चर्चा सुरू आहे. मराठवाड्यातील धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आग्रही आहे. महायुतीतील घटक पक्षासाठी अजित पवारांनी परभणी लोकसभेच्या (Lok Sabha Election News) जागेवर पाणी सोडले. पण धाराशिवसाठीचा त्यांचा आग्रह कायम असून, अर्धा डझनहून अधिक नावांवर गेल्या दोन दिवसांत चर्चा झाली.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे विश्वासू अशी ओळख असलेले मराठवाडा पदवीधर व मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार अनुक्रमे सतीश चव्हाण (Satish Chavan), विक्रम काळे (Vikram Kale) यांनीही ऐनवेळी लोकसभा नको रे बाबा म्हणत हात जोडले. त्यामुळे आता अजित पवार यांनी नव्या पर्यायाचा शोध घेत भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केल्याचे समजते. यासाठी पाटील यांचा राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेशही करवून घेतला जात आहे.

MLA Satish Chavan, MLA Vikram Kale
Pankaja Munde News : 'भाऊ विसरेल पण बहीण भावाला विसरत नाही' ; अजित पवारांच्या समक्ष पंकजा मुंडेंचं विधान!

महाविकास आघाडीने ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांची उमेदवारी जाहीर करून आठवडा उलटला तरी महायुतीतील घोळ मिटलेला नाही. दोन दिवसांपूर्वी मुंबईत आमदार सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीची चर्चा जारोत सुरू होती. पण संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदारसंघातून (Assembly Election) येणारी निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने त्यांनी लोकसभा लढवण्यास नम्रपणे नकार दर्शवला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चव्हाण यांनी माघार घेतल्यानंतर मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांच्या नावाची काल दिवसभर चर्चा होती. पण सायंकाळी त्यांचेही नाव मागे पडले. काळे-चव्हाण हे तीन टर्म पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. राज्यात आघाडी, महाविकास आघाडीची सरकारे सत्तेवर आली तेव्हा या दोघांनीही आम्हाला मंत्री करा, अशी जाहीर मागणी अजित पवार यांच्याकडे केली होती. परंतु त्यांच्या नावाचा पक्षाकडून विचार झाला नाही.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर या दोघांनीही अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीसाठी मोठा राजकीय अनुभव असलेल्या चव्हाण किंवा काळे यांनी धाराशिवमधून लोकसभा लढवावी, अशी अजित पवारांची इच्छा होती. परंतु दोघांनीही नकार दिल्याने नवा पर्याय शोधावा लागला. सतीश चव्हाण यांना आता विधानसभेची निवडणूक लढवायची आहे. जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदारंघातून त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून तयारी सुरू केली आहे.

MLA Satish Chavan, MLA Vikram Kale
Loksabha Election 2024 : बुलढाण्यात महायुतीत बंडखोरी; भाजपच्या विजयराज शिंदेकडून अपक्ष अर्ज

अजित पवारांचाही त्यांच्या या तयारीला पाठिंबा होता. निधीच्या माध्यमातून अजित पवारांनी त्यांना बळही पुरवले. मात्र, लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर बदलत्या राजकीय घडामोडीत अजित पवारांना लोकसभेसाठी उमेदवार म्हणून अनुभवी सहकाऱ्यांची गरज आहे. अनेक तडजोडीतून धाराशिवची जागा अजित पवारांनी राष्ट्रवादीसाठी (NCP) सोडवून घेतली.

सध्या विधान परिषदेवर आमदार असलेल्या काळे-चव्हाण या दोघांनी धाराशिवमधून लढण्यास असमर्थता दर्शवल्याचे बोलले जाते. चव्हाण यांना गंगापूरमधून विधानसभेची निवडणूक लढवायची आहे, तर काळे यांना शिक्षक मतदारसंघ सोडवत नाही. काळे यांना यापूर्वीही अजित पवारांनी धाराशिवमधून लोकसभा लढवण्याची ऑफर दिली होती. आता दुसऱ्यांदा काळे यांनी लोकसभेसाठी नकार दिला. मंत्रिपदासाठी आग्रह धरणाऱ्या या दोन्ही आमदारांना लोकसभेच्या मैदानात मात्र उतरण्याची इच्छा नाही.

R

MLA Satish Chavan, MLA Vikram Kale
Chhatrapati Sambhajinagar News : ठाकरे गटातील नाराजी नाट्य थांबेना, दानवे-खैरेंचे सूर जुळले असतानाच आता...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com