Loksabha Election 2024 : बुलढाण्यात महायुतीत बंडखोरी; भाजपच्या विजयराज शिंदेकडून अपक्ष अर्ज

Eknath Shinde बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील बंडखोरी अद्याप क्षमत नसल्याचे दिसत आहे. या आधी शिंदे यांच्या गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी अर्ज दाखल केला होता.
Prataprao Jadhav, Vijayraj Shinde
Prataprao Jadhav, Vijayraj Shindesarkarnama
Published on
Updated on

Buldhana Loksabha News : बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली आहे. हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला आलेला असताना भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य माजी आमदार विजयराज शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज भरताना त्यांनी एकनाथ शिंदेंचे उमेदवार भाजपच्या नेत्यांचा योग्य सन्मान देत नाहीत, असा आरोपही केला आहे.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील बंडखोरी अद्याप शमत नसल्याचे दिसत आहे. या आधीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजूत काढल्यानंतरदेखील अद्याप संजय गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही.

महायुतीची ही एक डोकेदुखी संपलेली नसतानाच भारतीय जनता पक्षातून विजयराज शिंदे यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीला या बंडखोरीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. अर्ज दाखल केल्यानंतर विजयराज शिंदे म्हणाले, मी केवळ सर्वसामान्य भाजपच्या कार्यकर्त्यांचे प्रतिनिधित्व करत असून हीच येथील मतदारांची भावना आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prataprao Jadhav, Vijayraj Shinde
Buldhana Politics : काँग्रेसच्या नेत्याचं विधान अन् ठाकरे गटातील नेत्यांच्या तोंडचं पाणी पळालं!

प्रतापराव जाधव चौथ्यांदा मैदानात

बुलढाणा लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाला आहे. या मतदारसंघात सलग तीन वेळा विजय मिळवणारे प्रतापराव जाधव हे चौथ्यांदा मैदानात उतरले आहेत. एकनाथ शिंदेंनी त्यांची उमेदवारी घोषित केली आहे. यापूर्वी २००९, २०१४, आणि २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीतदेखील प्रतापराव जाधव यांनी एक हाती विजय मिळवला होता. त्यांनी माजी मंत्री आणि सहकार नेते राजेंद्र शिंगणे Rajendra Shingane यांचा पराभव केला होता. या वेळी प्रतापराव जाधव यांना महायुतीतीलच बंडखोर नेत्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com