Aurangabad Lok Sabha Constituency Election 2024 : भुमरेंचा 'बाण' दिल्लीच्या दिशेने, इम्तियाज यांचा 'पतंग' कटला, तर 'मशाल' पेटलीच नाही

Mahayuti Aaghadi sandipan bhumre Leading in Aurangabad Constituency : चंद्रकांत खैरे यांच्या विजयाचा दावा करणाऱ्या एक्झिट पोलच्या अंदाजाला फोल ठरवत मीच विजयी होणार खैरे-इम्तियाज यांच्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी स्पर्धा असेल असा दावा भुमरे यांनी केला होता
Imtiyaaz Jaleel, Sandeepan Bhumre, Chandrakant Khaire
Imtiyaaz Jaleel, Sandeepan Bhumre, Chandrakant KhaireSarkarnama
Published on
Updated on

Aurangabad Lok Sabha 2024 Results LIVE : महायुतीचे संदीपान भुमरे संभाजीनगरमधून खासदार होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. स्वतःचे मतदान या मतदारसंघात नसताना भाजपच्या भक्कम साथीने भुमरे यांचा धनुष्यबाण दिल्लीच्या दिशेन सुसाट निघाला आहे. पहिल्या दोन फेऱ्या सोडल्या तर भुमरे यांनी त्या पुढच्या प्रत्येक फेरीत मतांची आघाडी कायम राखली.

बारा फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर संदीपान भुमरे एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यावर तब्बल 43724 मतांची आघाडी घेतली आहे. भुमरे यांना 273398 मिळाली तर इम्तियाज जलील 2 लाख 29 हजार 674 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या अफसर खान यांच्या उमेदवारीमुळे इम्तियाज यांना चांगलाच फटका बसताना दिसतो आहे.

वंचितमुळे एमआयएम चा पंतग यावेळी कटणार, अशी चिन्हे आहेत. सर्वात निराशाजनक कामगिरी आतापर्यंत झाली ती शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि सलग चार टर्म संभाजीनगर मध्ये निवडून गेलेल्या चंद्रकांत खैरे यांची. एक्झिट पोलमध्ये ज्या खैरेंना विजयी होणार असे सांगण्यात आले होते, ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. खैरे यांना 1 लाख 73 हजार 887 मते मिळाली आहेत. भुमरे यांच्यापेक्षा ते तब्बल लाखभर मतांनी पिछाडीवर आहेत.

त्यामुळे एक्झिट पोलच्या अंदाजानंतर भुमरे यांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया खरी ठरताना दिसत आहे. खैरे यांच्या विजयाचा दावा करणाऱ्या एक्झिट पोलच्या अंदाजाला फोल ठरवत मीच विजयी होणार खैरे-इम्तियाज यांच्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी स्पर्धा असेल असा दावा भुमरे यांनी केला होता. त्याचा दावा खरा ठरताना दिसत आहे. इम्तियाज जलील यांना हक्काची मुस्लिम मते एकगठ्ठा मिळाली असली तरी वंचित सोबत नसल्याचा फटका त्यांना बसला आहे.

Imtiyaaz Jaleel, Sandeepan Bhumre, Chandrakant Khaire
Marathwada Lok Sabha Election Result 2024 Live: मराठवाड्यात महायुतीचा सुपडासाफ, बीड, संभाजीनगर वगळता 6 मतदारसंघात 'बॅकफूट'वर

प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमच्या विरोधात अफसर खान यांच्या रुपाने मुस्लिम उमेदवार दिला याचाही काही प्रमाणात इम्तियाज यांची मत घटण्यात झाल्याचे दिसून आले आहे. वंचितच्या अफसरखान यांनी 40 हजार 205 मतं आतापर्यंत घेतली आहे. दुसरीकडे 2019 च्या निवडणुकीत तब्बलल 2 लाख 83 हजार मतं घेत संभाजीनगरचा निकाल फिरवणारे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यावेळी फेल ठरले. कन्नड विधानसभा मतदारसंघ सोडला तर त्यांना इतर ठिकाणी मतदारांनी नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी जाधव यांची गाडी 24629 मतांवर येऊन अडकली आहे. मतदानाच्या एकूण 27 फेऱ्या आहेत. निम्म्याहून अधिक मतांची मोजणी झाली आहे. संभाजीनगर मतदारसंघात 63 टक्के म्हणजेच 12 लाख 09920 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

संदीपान भुमरे जालना लोकसभा मतदारसंघात असलेल्या पैठण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि राज्याच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत. संभाजीनगरात उशीरा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कमी वेळात भुमरे यांना तयारी करावी लागली होती. भुमरे विजयी झाले तर त्यांच्या या यशात भाजपच्या यंत्रणेचा सिंहाचा वाटा असणार आहे. ठाकरे गटासाठी मात्र संभाजीनगरातील पराभव धक्का देणारा ठरणार आहे. चंद्रकांत खैरे यांना ना पक्ष फुटल्याची सहानुभूती मिळाली, ना त्यांनी माझी ही शेवटची निवडणूक असल्याचे सांगणे त्यांच्या कामी आले. खैरे पराभूत झाले तर ही निवडणूकच त्यांच्या राजकीय निवृत्तीची शेवटची निवडणूक ठरणार आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Imtiyaaz Jaleel, Sandeepan Bhumre, Chandrakant Khaire
Marathwada Lok Sabha Election Result 2024 Live: मराठवाड्यात महायुतीचा सुपडासाफ, बीड, संभाजीनगर वगळता 6 मतदारसंघात 'बॅकफूट'वर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com