Loksabha Election 2024 : अमित शाहांच्या दौऱ्यानंतर पुन्हा संभ्रम; 'बीड'ची उमेदवारी नेमकी कोणत्या मुंडेंना?

BJP MP Dr. Pritam Munde or Pankaja Munde in Beed Constituency : विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडेच भाजपच्या उमेदवार असतील, की राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे नाव भाजपच्या उमेदवार यादीत येणार यावरून कार्यकर्त्यांत संभ्रम सुरू आहे.
Pankaja Munde, Amit Shah, Dr. Pritam Munde
Pankaja Munde, Amit Shah, Dr. Pritam MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed News : भाजपने लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत महायुतीच्या भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे जागावाटप निश्चित होणार आहे. मराठवाड्यातील बहुतांशी जागा भाजप लढविणार असल्याचे सांगितले जात आहे.

यात महत्त्वाची बीड लोकसभेची जागा भाजपच लढविणार असले तरी उमेदवार कोण हा संभ्रम नव्याने तयार झाला आहे. विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडेच भाजपच्या उमेदवार असतील, की राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे नाव भाजपच्या उमेदवार यादीत येणार यावरून कार्यकर्त्यांत संभ्रम सुरू आहे.

महायुतीतील जागावाटप निश्चित नसल्याने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. दरम्यान, अमित शाह छत्रपती संभाजीनगरला येऊन गेले. त्यानंतर महायुतीमधील महाराष्ट्रातील जागावाटपाबद्दल अमित शाहांच्या प्रमुख उपस्थितीत खल सुरू आहे. बीड लोकसभेचा उमेदवार अमित शाह हे स्वतः निश्चित करतील असे बोलले जाते. विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी जोरदार तयारीदेखील सुरू केली आहे.

नुकत्याच झालेल्या महायुतीच्या मित्रपक्ष संमेलनात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी डॉ. प्रीतम मुंडे याच उमेदवार असतील व त्या तिसऱ्यांदा विक्रमी मतांनी लोकसभेत पोहोचतील असे जाहीर केले. मात्र, या मित्रपक्ष संमेलनाला जिल्ह्यातील भाजप (BJP) च्या तीनपैकी एकाही आमदाराची उपस्थिती नव्हती इथेच पाल चुकचुकली आहे.

Pankaja Munde, Amit Shah, Dr. Pritam Munde
Sanjay Raut on Amit Shah : "ठाकरेंना लाज वाटली पाहिजे," शाहांच्या या विधानानंतर राऊतांनी सगळंच काढलं; म्हणाले...

दरम्यान, पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा परळी विधानसभा मतदारसंघातून 2019 च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना भाजपने कायमच डावलल्याची समर्थकांची भावना आहे. त्यांच्याकडे भाजपचे राष्ट्रीय सचिव पद आणि मध्य प्रदेशचे सहप्रभारी पद आहे. मात्र, मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीतदेखील पंकजा मुंडे यांचा सहभाग दिसला नाही.

आगामी विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला जागा, असे समीकरण ठरले तर या जागेवर राज्याचे कृषिमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना उमेदवारी भेटू शकते, मग पंकजा मुंडेंचे काय, असा पेच आहे. त्यामुळे लोकसभेची उमेदवारी पंकजा मुंडेंना दिली जाऊ शकते. मात्र, खुद्द पंकजा मुंडे यांनी परळीत झालेल्या कार्यक्रमात आपण डॉ. प्रीतम मुंडे यांच्या जागेवर निवडणूक लढणार नाही, असे ठासून सांगितले आहे.

त्यामुळे भविष्यात पंकजा मुंडे यांचे काय हा पेच पक्षापुढे असणार आहे. डॉ. प्रीतम मुंडे दोन वेळेस मोठ्या मताधिक्याने लोकसभेला विजयी झाल्याने पक्ष पुन्हा त्यांनाच उमेदवारी देईल. उमेदवारी यादी जाहीर करण्याची घटिका समीप आल्याने उमेदवारी पंकजा मुंडेंना, की पुन्हा डॉ. प्रीतम मुंडेंना असा खल सुरू झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बीड लोकसभेचा उमेदवार कोण असेल, असा संभ्रम मात्र कायम आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बदलती राजकीय समीकरणे, मराठा व धनगर आरक्षण आंदोलन, ओबीसी आंदोलन यामुळे ही निवडणूक ओढून नेण्यासाठी पंकजा मुंडे याच सक्षम उमेदवार ठरू शकतात, असे भाजपच्या एका गटाचे म्हणणे आहे. तसेच मागील निवडणूक जरी प्रीतम मुंडे यांनी लढली असली तरी त्यावेळी जिल्हा परिषद, राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता होती. पंकजा मुंडे ग्रामविकासमंत्री होत्या तसेच जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. जिल्ह्यात भाजपचे सहापैकी पाच आमदार होते. त्यामुळे मागची निवडणूक सोपी गेली होती.

आजच्या घडीला जरी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये असला तरी तुलनेने भाजपपेक्षा राष्ट्रवादी ताकदवान आहे. त्यामुळे त्यांची ताकद भाजपकडे ओढण्यासाठी व जिल्ह्यातील राजकीय प्रतिकूल परिस्थिती हँडल करण्यासाठी पंकजा मुंडे याच उमेदवार म्हणून गरजेचे असल्याचेदेखील भाजपमधील एका गटाचे मत आहे.

जिल्ह्यातील संपर्क, कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी सहज उपलब्धता ही खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल, असे भाजपच्या एका गटाचे मत आहे. मात्र, भाजपने मागच्या पाच वर्षांत ज्या पद्धतीने सर्वच खेळ अनपेक्षित खेळले आहेत. तसेच बीड लोकसभेबाबतदेखील भाजप काहीतरी वेगळीच खेळी करेल असे राजकीय जाणकारांना वाटते. त्यामुळे नाव प्रीतम मुंडे यांचे येणार की पंकजा मुंडे यांचे, हे कोडे सर्वांनाच पडले आहे.

(Edited by Amol Sutar)

R

Pankaja Munde, Amit Shah, Dr. Pritam Munde
Gokul Dudh Sangh: गोकुळ दूध संघात 35 लाखांचा अपहार? आत्महत्येच्या धमकीनंतर प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com