Prakash Ambedkar News : 'मुस्लिम मते हवीत पण उमेदवार नको', प्रकाश आंबेडकरांचा 'मविआ'वर निशाणा

Loksabha Election 2024 : महाविकास आघाडीला मुस्लिम मतदान हवे आहे. मुस्लिम उमेदवार नको, असे ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही
Prakash Ambedkar News
Prakash Ambedkar News Sarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election : महाविकास आघाडीकडून आत्तापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या लोकसभा उमेदवारांमध्ये तब्बल 28 उमेदवार मराठा (Maratha) आहेत. आठ ओबीसी तर आहेत. महाविकास आघाडीकडून एकही मुस्लिम उमेदवार देण्यात आलेला नाही. हाच मुद्दा पकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने 'वंचित'चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

Prakash Ambedkar News
Constitution News : नवीन संविधानासाठी हवेत दोन तृतियांश खासदार! भाजप खासदार थांबेनात, पुन्हा वादग्रस्त विधान

महाविकास आघाडीला (MahaVikasAghadi) मुस्लिम मतदान हवे आहे. मुस्लिम उमेदवार नको, असे ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही आणि यावर प्रसार माध्यमे देखील गप्प का आहेत, असा सवाल देखील प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar ) यांनी उपस्थित केला आहे.

महाविकास आघाडीला भाजपप्रमाणे मुस्लिमांना वगळायचे असेल तर दोघांमध्ये काय फरक आहे? प्रस्थापित राजकीय पक्ष मुस्लिमांना निवडणुकीच्या राजकारणात प्रतिनिधित्व देत नाहीत, त्यांच्यावर बहिष्कार घालतात याबाबत प्रसार माध्यम गप्प का? असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. महाविकास आघाडी आणि भाजपला मुस्लिमांची केवळ मते हवी आहेत पण त्यांनी मुस्लिमांना प्रतिनिधित्व दिलेले नाही, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीमध्ये आत्तापर्यंत जाहीर झालेल्या जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नऊ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यापैकी 6 मराठा, 2 ओबीसी तर 1 अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. त काँग्रेसच्या आत्तापर्यंत जाहीर केलेल्या 15 जागांवरील उमेदवारांमध्ये 6 मराठा, 3 ओबीसी, 4 अनुसूचित जाती, 1 अनुसूचित जमातीच्या उमेदवाराला संधी दिली आहे. वसेनेतील (ठाकरे गट) 21 पैकी 16 मराठा, 3 ओबीसी, 1 अनुसूचित जाती, 1 अनुसूचित जमातीच्या उमेदवाराला लोकसभेच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे.

Prakash Ambedkar News
Sushma Andhare News: अंधारेंनी राणेंना दिल्या शुभेच्छा; म्हणाल्या, 'चांगल्या डॉक्टरांना दाखवा, लवकर बरे व्हा...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com