Loksabha Election 2024 : पंकजा मुंडेंचा बीडच्या जनतेला शब्द; म्हणाल्या, जिल्हा विकासाच्या उंचीवर नेऊ....

Pritam Munde पंकजा मुंडे म्हणाल्या, प्रीतम मुंडे खासदार म्हणून काम करतानाही या भागासाठी निधी दिला. मंत्री असताना मी बीडला जरी येऊ शकले नाही, तरी माझ्या माध्यमातून विकासाचा निधी बीड जिल्ह्यासाठी येत होता.
Pankaja Munde
Pankaja Mundesarkarnama
Published on
Updated on

Beed News : माझा परिवार म्हणजे तुम्ही सर्वजण आहात. मी कधीही विकास निधी देताना भेदभाव केला नाही. जिल्ह्यावर माझे खूप प्रेम आहे. या जिल्ह्यातील मातीने माझ्या वडिलांना घडवले. पाच वर्षे मंत्री असताना विविध विकासकामे या भागात केली. दिवंगत मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बेटी पंकजाला आम्ही दिल्लीला आणण्याचा निश्चय केल्याचे स्वतः पंतप्रधान मोदीजींनी अंबाजोगाईच्या सभेत सांगितले. त्यामुळे पुढच्या पाच वर्षांत जिल्हा विकासाच्या उंचीवर नेऊ, असा विश्वास भाजपच्या लोकसभा उमेदवार पंकजा मुंडे यांनी दिला.

पंकजा मुंडे म्हणाल्या, प्रीतम मुंडे खासदार म्हणून काम करतानाही या भागासाठी निधी दिला. मंत्री असताना मी बीडला जरी येऊ शकले नाही तरी माझ्या माध्यमातून विकासाचा निधी बीड जिल्ह्यासाठी येत होता. विकासाची कामे झपाटल्यासारखे मी करत होते. त्या प्रत्येकवेळी जिल्ह्यातील वंचित आणि उपेक्षित घटकासाठी काम मी केले.

स्त्रीची काम करण्याची पद्धत वेगळी असते जसं आपलं घर आपण स्वच्छ करावं तसंच मी मंत्री असताना बीड जिल्ह्यात काम केले. दिवंगत मुंडेंची आठवण तुम्हाला होईल असेच काम मला भविष्यातही करायचे आहे. देशाच्या सर्वोच्च सभागृहात जाण्यासाठी ही निवडणूक आहे, त्यामुळे बुद्धिभेदाला जागा देऊ नका, असे आश्वासन त्यांनी केले.

Pankaja Munde
Beed Loksabha Election: तुतारीवाल्याकडून बीडचा विकास होणार नाही, ते केवळ..' ; धनंजय मुंडेंचा बजरंग सोनवणेंवर आरोप!

मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले आहे, मात्र न्यायालयात ते आरक्षण टिकले नाही. परंतु आता सरकारने पुन्हा मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका. शिक्षण, नोकरी, रोजगार, पाणी, परिसराचा विकास, चांगले रस्ते, आरोग्य यासह विकासाच्या मुद्द्यावर आपण सातत्याने काम करत आलो आहोत, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

नेकनूर येथील सभेत त्यानी ग्रामपंचायत इमारत, पंचायत समिती इमारती बांधल्या, अनुदान दिले. बचतगटांना निधी मिळवून दिला. ऊसतोड कामगारांना मानधन तसेच मुकादमांना कमिशन वाढवून दिल्याचे सांगीतले. तुमची मीच काळजी घेईल, असेही त्या म्हणाल्या. आमदार नमिता मुंदडा, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, गोविंद केंद्रे, नंदकिशोर मुंदडा, भरत काळे, नारायण शिंदे, गोरक्ष रसाळ, अनिता लांडगे, सचिन शिंदे, अमित देशमुख, सय्यद शोयब, त्रिंबक काळे, अरविंद निर्मळ आदींची उपस्थिती होती.

Edited By : Umesh Bambare

Pankaja Munde
Pankaja Mundhe News : पंकजा मुंडेंसाठी जिल्ह्यासह बाहेरुनही बड्या नेत्यांची कुमक !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com