Loksabha Election 2024 : पंकजा मुंडे, राठोड यांची ऑडिओ क्लिप व्हायरल; फॉर्म काढून घेण्याची केली विनंती...

Ravikant Rathod रविकांत राठोड हे आधी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशचे उपाध्यक्ष म्हणून काम करत होते. मात्र बीड लोकसभेसाठी त्यांनी अपक्ष फॉर्म भरल्यानंतर त्यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.
Ravikant Rathod, Pankaja Munde
Ravikant Rathod, Pankaja Mundesarkarnama

Beed Loksabha News : भाजप नेत्या आणि बीडच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा आणि अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांसोबत चा ऑडिओ कॉल व्हायरल झाला आहे.. बंजारा समाजाचे नेते रविकांत राठोड यांच्यासोबत बोलत असताना पंकजा मुंडे यांनी त्यांना फॉर्म काढून घेण्यासंदर्भात विनंती केली आहे.

बीड जिल्ह्यामध्ये सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटला आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांची अडचण झाली आहे. ही सर्व परिस्थिती असताना त्यांनी बंजारा समाजाचे नेते रविकांत राठोड यांच्याशी केलेल्या मोबाईलवरील संवादाची ॲडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे.

बीड जिल्ह्यामध्ये सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटला असताना रविकांत राठोड यांनी त्यांना सहकार्य करण्यासंदर्भात बोलत असतानाची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे ही उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात उमेदवाराला विनंती करत असताना पंकजा मुंडे यांनी त्यांची संपूर्ण काळजी घेण्याचं आश्वासन सुद्धा दिला आहे.

Ravikant Rathod, Pankaja Munde
Beed Loksabha Election: तुतारीवाल्याकडून बीडचा विकास होणार नाही, ते केवळ..' ; धनंजय मुंडेंचा बजरंग सोनवणेंवर आरोप!

विशेष म्हणजे महामंडळाच्या संदर्भातील तुमच्या त्या कामाला मी मदत करेल असं म्हणून पंकजा मुंडे यांनी रविकांत राठोड यांना मदत करण्यासंदर्भात आवाहन केल आहे. रविकांत राठोड हे आधी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशउपाध्यक्ष म्हणून काम करत होते.

राजकारणातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट॒ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनल फॅलो करा!

मात्र, बीड लोकसभेसाठी त्यांनी अपक्ष फॉर्म भरल्यानंतर त्यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात ते आता काम करत आहेत. त्यामुळे या व्हायरल ॲडिओ क्लिपमुळे पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी अजित पवारांचा गट मदत करणार का यांची उत्सुकता आहे.

Edited By : Umesh Bambare

Ravikant Rathod, Pankaja Munde
Pankaja Munde News : पंकजा मुंडेंसाठी आडसकरांवर दुहेरी जबाबदारी; माजलगाव, केजमध्ये घातले लक्ष

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com