Mahadev Jankar News : महादेव जानकर टाकणार नवा डाव; आघाडी अन् युतीचा खेळ बिघडवणार

Loksabha Election 2024 : धनगर समाज व ओबीसी मतदारही भारतीय जनता पक्षाची पारंपारिक वोटबँक आहे.
Mahadev Jankar Latest News
Mahadev Jankar Latest NewsSarkarnama

Parbhani News : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.जिल्ह्यात धनगर मतदारांची मोठी संख्या आहे. त्यामुळे महादेव जानकर यांची उमेदवारी महायुतीच्या उमेदवाराला धोक्याची घंटा ठरू शकते.महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपाबाबत अजूनही स्पष्टता नसताना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवण्याची तयारी केल्याने राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

राज्यातील राष्ट्रीय समाज पक्षाचे एकमेव आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) हे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. राज्यातील धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाकडे बघितले जाते. परभणी जिल्ह्यात धनगर समाजाचे प्राबल्य असून अंदाजे तीन लाख मतदार आहेत. त्यामुळे महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवण्याची तयारी केली आहे. \

Mahadev Jankar Latest News
Nilesh sambare: नीलेश सांबरेंची मोठी घोषणा; भिवंडीतून अपक्ष निवडणूक लढविणार !

बीड येथील ओबीसी मेळाव्यात त्यांनी तसे जाहीर केले आहे. धनगर समाज व त्यासोबत ओबीसी मतदार यांची सांगड घालून निवडणुकीचे मैदान मारण्याचा महादेव जानकर(Mahadev Jankar) यांचा संकल्प दिसून येत आहे. परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मतदारसंघात नेहमीच शिवसेनेचा उमेदवार निवडून येतो. विद्यमान खासदार संजय जाधव यांची ही तिसरी टर्म आहे. शिवसेनेतील फुटीनंतर जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याच्या निर्णय घेतला.

त्यामुळे महाविकास आघाडीचे तेच उमेदवार असतील हे जवळपास निश्चित समजले जात आहे. तर परभणीच्या जागेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) मध्ये जोरदार रस्सीखेच चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने परभणीच्या जागेसाठी प्रतिष्ठापणाला लावली आहे. त्यातच महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीची तयारी चालू केली आहे. जानकर यांची उमेदवारी महायुतीचे गणित बिघडवू शकते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धनगर समाज व ओबीसी मतदारही भारतीय जनता पक्षाची पारंपारिक वोटबँक आहे. महादेव जानकर यांची उमेदवारी याच वोटबँकेवर लक्ष ठेवून आहे. धनगर समाज व ओबीसी मतांची विभागणी महायुतीच्या उमेदवारासाठी अडचणीची ठरू शकते. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना(उबाठा), काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्ष असल्याने दलित, मुस्लिम मतदार महाविकास आघाडीसाठी जमेची बाजू आहे.

त्यातच पुन्हा धनगर (Dhangar) व ओबीसी मतांची विभागणी महाविकास आघाडीसाठी दुधात साखर घालणारी असणार आहे. तर महायुतीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ही जमेची बाजू आहे. मात्र धनगर आणि ओबीसी मते गमावणे पक्षाला परवडणारे नाही.

(Edited By Deepak Kulkarni)

Mahadev Jankar Latest News
Nilesh sambare: नीलेश सांबरेंची मोठी घोषणा; भिवंडीतून अपक्ष निवडणूक लढविणार !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com