Santosh Bangar News: आधीच वादग्रस्त, त्यात आता शाळेतल्या पोरांना बांगरांचा भलताच सल्ला; 'मला मतदान केलं तरच...'

Maharashtra Politics: वादग्रस्त वक्तव्यांमुळे संतोष बांगर हे नेहमीच चर्चेत राहतात. 2024 मध्ये मोदी पंतप्रधान झाले नाही तर भर चौकात गळफास घेणार,असे म्हटले होते.
Santosh Bangar
Santosh Bangar sarkarnama
Published on
Updated on

Political News : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे शिंदे गटातील आमदार संतोष बांगर हे नेहमीच चर्चेत असतात. आता शाळेतील चिमुकल्यांना अजब सल्ला देणारा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 'तुमचे आई-वडील मला मतदान करत नसतील तर दोन दिवस जेवण करू नका. त्यांनी विचारले का जेवण करत नाही तर सांगा आमदार संतोष बांगरला मतदान करा तेव्हाच जेवण करणार,' असा सल्ला शाळेतील मुलांना संतोष बांगर देताना दिसत आहेत. (Santosh Bangar News )

Santosh Bangar
Nikhil Wagle Attack : 'निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला करणारे कुत्रेच होते का ?'; रोहित पवारांचा फडणवीसांना संतप्त सवाल

हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) आहेत. बांगर यांनी फक्त मुलांना सल्लाच दिला नाही, तर 'कोणाला मतदान करणार संतोष बांगरला' असे चिमुकल्यांकडून दोनदा तीनदा वदवून घेतले. 2024 मध्ये मोदी पंतप्रधान झाले नाही तर भर चौकात गळफास घेणार, बाजार समितीच्या निवडणुकीत हरलो तर मिशी कापणार, अशी वक्तव्यं बांगर यांनी या आधी केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील लाख शाळेतील विकासकामांच्या भूमिपूजनाला संतोष बांगर उपस्थित होते. शाळेतील भूमिपूजनानंतर त्यांनी थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 'तुमचे पप्पा निवडणुकीत दुसरीकडे मतदान करणार असतील तर तुम्ही दोन दिवस जेवण करू नका. त्यांनी विचारलं का जेवण करायचं नाही तर सांगा आमदार संतोष बांगर यांना मतदान करायचं, तेव्हाच मी जेवण करतो. नाही तर करणार नाही,' असे ठणकावून सांगण्याचा सल्ला बांगर यांनी या चिमुकल्यांना दिला.

R

Santosh Bangar
Chhagan Bhujbal News : धमकीच्या पत्रानंतर छगन भुजबळांनी जाहीर केली भूमिका, म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com