Akshay Dhoble News : ठाकरे गटाचा युवा सेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!

Yuva Sena of Thackeray Group : धाराशिवमधील आनंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Akshay Dhoble
Akshay DhobleSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : केलेल्या बांधकामाचे पैसे न देता सतत मानसिक त्रास दिल्याने तरुणाने आत्महत्या केली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट युवा सेनेचा विभागीय सचिव आणि जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळेविरोधात धाराशिवमधील आनंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

धाराशिव(Dharashiv) तालुक्यातील आळणी येथील राहुल श्रीरंग किरदत्त (वय 34 वर्ष) हा तरुण डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ढोबळे कॉम्पलेक्स धाराशिव येथे काही वर्षांपूर्वी पानाचे दुकान चालवत होता. त्याठिकाणी कॉम्प्लेक्स बांधकाम झाल्यानंतर त्याला व्यवसायासाठी जागा नव्हती. मात्र याच कॉम्प्लेक्समध्ये तिसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या बांधकामाच्या एका बंद रूममध्ये त्याने 8 ते 10 फेब्रुवारी दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Akshay Dhoble
Maratha Reservation : गेवराईत सकल मराठा समाजाने घेतला 'हा' मोठा निर्णय!

त्याच्या आत्महत्येची माहिती तीन-चार दिवसांनी कॉम्प्लेक्स मालक उद्धव बाळासाहेब ठाकरे(Uddhav Thackeray) गट युवा सेनेचे विभागीय सचिव अक्षय ढोबळे यांना कळाली. त्यामुळे त्यांनी घटनास्थळाला भेट देत पोलिसांना माहिती दिली.

राहुल किरदत्त यास शहरातील एका बँकेची कर्ज वसुलीची नोटीस आल्याने तो आरोपी अक्षय संजय ढोबळे यास कॉम्पलेक्सच्या बांधकामावरील कामाचे पैसे मागत होता. परंतु अक्षय ढोबळे राहुल किरदत्त यास पैसे देण्यास टाळाटाळ करून सतत वाद घालत असे. या मानसिक त्रासास कंटाळून राहुलने आत्महत्या केल्याची फिर्याद त्याचे वडील श्रीरंग भगवान किरदत्त, (वय 65 वर्षे), रा. दत्तनगर यांनी 28 फेब्रुवारी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अक्षय ढोबळे याच्या विरुद्ध भा.दं.वि. सं. कलम-306 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. 

Akshay Dhoble
Karad and Bhumre News : 'त्या' प्रकरणात खंडपीठाचा उद्योगमंत्र्यांसह कराड, भुमरेंना धक्का!

अक्षय ढोबळे ठाकरे गट युवा सेनेचा विभागीय सचिव आणि जिल्हा प्रमुख आहे. धाराशिव येथे 2016 ते 2021 या काळात ठाकरे सेनेकडून नगरसेवक म्हणून तो निवडून आला होता. त्याने जे कॉम्प्लेक्स बांधले आहे त्या प्रकरणी अनेक तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत. विशेष प्रतिनिधी अक्षय ढोबळे याने युवा सेनेच्या(Yuva sena) वतीने धाराशिव शहरात ड्रग्ज विरोधी जनजागृती मोहिम आणि मोर्चाही काढला होता.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com