Loksabha Election : प्रचाराची रणधुमाळी थांबली, उमेदवारांची पावले देवाच्या दारी!

Chhatrapati Sambhajinagar Constituency : 2009 च्या लोकसभा निवडणुकीत कडवी झुंज दिली, या निकषावर काँग्रेसने पंधरा वर्षानंतर पु्न्हा काळे यांना जालन्यात उमेदवारी दिल्याचे बोलले जाते.
Devdarshan
Devdarshansarkarnama

Political News : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार काल थांबला आणि उमेदवारांना देव आठवला, असे चित्र सध्या दिसत आहे. उमेदवारी मिळवण्यापासून ते अर्ज दाखल करणे, प्रचार यंत्रणा राबवणे आणि घरोघरी जाऊन आपणच कसे योग्य उमेदवार आहोत हे पटवून देतांना उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली. उन्हातान्हात दोन आठवडे प्रचार केल्यानंतर आता उद्या सोमवारी (ता.13) प्रत्यक्ष परीक्षा म्हणजे मतदान होणार आहे.

Devdarshan
Pune Lok Sabha: मतदानापूर्वी निवडणूक आयोगाने घेतले 'हे' तीन महत्त्वपूर्ण निर्णय

अभ्यास झाल्यानंतर पेपर देण्याची वेळ येते तेव्हा जसा देव आठवतो तशीच काहीसी अवस्था उमेदवारांची झाली आहे. प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर नेत्यांनी देवाचा धावा केला आहे. छत्रपती संभाजीनगर व शेजारच्या जालना मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार MVA अनुक्रमे चंद्रकांत खैरे, डाॅ. कल्याण काळे यांनी आपल्या दिवसाची सुरूवात देवदर्शनाने केली.

खैरे Chandrakant Khaire यांनी जागृत मारुती मंदीर असलेल्या भद्रा मारोतीचे दर्शन घेत मतदान आणि त्यानंतर विजयासाठी साकडे घातले. तर कल्याण काळे यांनी आपल्या मतदारसंघातील बाबरा येथील श्री. बालाजी-लक्ष्मी देवी आणि पिसादेवी येथील हनुमान मंदिरात जाऊन डोके ठेवले.

`मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्। वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, मंत्राचा जप करत काळे यांनी मारोतीरायाचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात केली. कल्याण काळे यांची लढत जालना मतदारसंघाचे पाचवेळा खासदार राहिलेल्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी होत आहे.

2009 च्या लोकसभा निवडणुकीत कडवी झुंज दिली, या निकषावर काँग्रेसने पंधरा वर्षानंतर पु्न्हा काळे यांना जालन्यात उमेदवारी दिल्याचे बोलले जाते. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काळे यांच्या प्रचारात कुठलीही कसर ठेवलेली नाही. त्यामुळे आता उद्या 13 तारखेला मतदार कोणाच्या झोळीत मतांचे दान टाकतात यावर दानवे की काळे? हे ठरणार आहे.

(Edited By Roshan More)

Devdarshan
Lok Sabha Election 2024: पुलवामा हल्ल्यावेळी PM मोदी..., भास्कर जाधवांची बोचरी टीका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com