Sahar Shaikh : 'शिंदेंची शिवसेना हिंदुत्ववादी नाही, एमआयएमप्रमाणे धर्मनिरपेक्ष', 'कैसा हराया' फेम सहर शेखचे मोठे वक्तव्य

Eknath Shinde Shiv Sena : सहर शेख म्हणाल्या की, आम्ही शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे, यामध्ये विश्वास ठेवत नाही. एमआयएमप्रमाणे तो सेक्युलर पक्ष आहे.
Yunus Sheikh Join Shivsena; AIMIM corporator Sahar Shaikh
Yunus Sheikh Join Shivsena; AIMIM corporator Sahar ShaikhSarkarnama
Published on: 
Updated on: 

Sahar Shaikh News : एकनाथ शिंदेंची शिवसेना पक्ष हा हिंदुत्ववादी पक्ष नाहीये. एमआयएम धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. तसा शिवसेना देखील सेक्युलर पक्ष आहे, असे मत 'कैसा हराया' फेम सहर शेख यांनी व्यक्त केले आहे. सहर शेख यांचे वडील युनूस खान यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याच्या चर्चा होत्या. त्या पार्श्वभूमीवर सहर शेख यांनी हे वक्तव्य केले.

त्या म्हणाल्या, 'माझे वडील अखिल भारतीय केबल सेनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ते या संघटनेत अनेक वर्ष सदस्य होते. आता त्यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. मुलगी म्हणून मी त्यांचे अभिनंदन करते.'

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, 'आम्ही शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे, यामध्ये विश्वास ठेवत नाही. शिवसेना सर्वांनासोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. याच्यावर आमचा विश्वास आहे.'

युनूस शेख यांच्या नियुक्तीवर बोलताना त्या म्हणाल्या की, 'तुम्ही मंत्री शिरसाठसाहेब यांचे देखील वक्तव्य ऐकले असेल. ते म्हणाले की यामध्ये हिंदु-मुस्लिम राजकारणाचे ट्विस्ट का दिला जातो आहे.'

Yunus Sheikh Join Shivsena; AIMIM corporator Sahar Shaikh
Thane Politics : ‘कैसे हराया’ फेम सहर शेखच्या वडिलांच्या शिवसेना प्रवेश? भाजप मंत्री चांगलाच भडकला; युनूस शेख यांचा खुलासा

युनूस शेख काय म्हणाले,

युनूस शेख यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा सुरू झाली. त्यांच्या शिवसेना प्रवेशाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. तसेच कळवा-मुंब्रा केबल सेनेच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तिपत्रही समोर आले होते. मात्र, युनूस खान यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे वृत्त फेटाळून लावले असून, “मी शिवसेनेत प्रवेश केलेला नाही,” असे स्पष्ट केले आहे. ते म्हमाले, ‘अखिल भारतीय केबल सेना’ असे या संघटनेचे नाव असून, मी या संघटनेचा सदस्य आहे. ही केबल सेना शिंदे यांच्या शिवसेनेच्या अखत्यारित येते.

Yunus Sheikh Join Shivsena; AIMIM corporator Sahar Shaikh
AIMIM On SIR : देशभरात 'SIR' विरोधात विरोधक आक्रमक पण MIM शांत! टीका सुरु झाल्यानंतर ओवैसींचा आला आदेश, भाजपच्या 19000 आक्षेंपाना केले चॅलेंज

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com