Abdul Sattar : 'मांसाहार करूनच घराबाहेर...'; अब्दुल सत्तार शंकराच्या मंदिरात गेल्याने नवा वाद, तरूणांनी गोमूत्र शिंपडलं तर भाजपच्या तुषार भोसलेंनीही सुनावलं

Abdul Sattar Temple Visit Controversy: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते तथा राज्याचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी एका मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संभाजीनगर जिल्ह्यातील रहिमाबाद येथील नागेश्वर मंदिरात जाऊन अब्दुल सत्तार यांनी दर्शन घेतलं.
Abdul Sattar Shiv Mandir visit Maha Shivratri 2026
Abdul Sattar Shiv Mandir visit Maha Shivratri 2026Sarkarnama
Published on
Updated on

Abdul Sattar non-veg controversy at Shankar temple: राज्यासह देशभरात काल महाशिवरात्रीचा सण अत्यंत उत्साह आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. महाशिवरात्रीच्या निमित्ताने अनेक नेत्यांनी विविध शिवमंदिरांमध्ये जाऊन भगवान शंकराचा अभिषेक केला.

मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते तथा राज्याचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी एका मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संभाजीनगर जिल्ह्यातील रहिमाबाद येथील नागेश्वर मंदिरात जाऊन अब्दुल सत्तार यांनी दर्शन घेतलं.

यावर काही तरूणांनी आक्षेप घेत थेट गोमूत्र शिंपडून मंदिर स्वच्छ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे आता नवा वाद सुरू झाला असून स्थानिक तरूणांनी सत्तार हे रोज मांसाहार करून घराबाहेर पडतात. त्यामुळे त्यांना मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा अधिकार नाही असा दावा केला आहे.

Abdul Sattar Shiv Mandir visit Maha Shivratri 2026
Shivsena UBT : 'मुंबईतील रस्त्यांना 'टिपू'चे नाव द्यायचा प्रस्ताव भाजपचाच; महापौर रितू तावडे साक्षीदार, आपल्या फायद्यासाठी त्याची कबर...' ठाकरेंचा घणाघात

तर सत्तारांनी दर्शन घेतल्यानंतर तरूणांनी मंदिर स्वच्छ केल्याचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर दुसरीकडे भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी देखील या घटनेचं समर्थन केलं आहे.

शिवाय त्यांनी सत्तारांनी मंदिरात जाणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. भोसले म्हणाले, "अब्दुल सत्तारांनी हिंदू धर्मात प्रवेश केलाय का? आणि नसेल केला तर त्यांनी बाहेरून दर्शन घ्यायला पाहिजे होतं. आमच्या देवी देवतांची मंदिरं काही स्मारकं नाहीत.

Abdul Sattar Shiv Mandir visit Maha Shivratri 2026
Bhiwandi Politics : भिवंडीत शिंदेंना साथ देण्याची भूमिका घेताच कोणार्क विकास आघाडीच्या नेत्याला अटक, महापौर कोणाचा भाजप की शिवसेना?

हिंदू धर्मात गर्भगृहाचे काही धार्मिक नियम असतात. राजकीय फायद्यासाठी आमचे धार्मिक नियम मोडू नका. आणि तुम्हाला खूपच इच्छा असेल तर हिंदू धर्मात प्रवेश करा आणि खुशाल देवी देवतांचे आशीर्वाद घ्या.", अशा शब्दात भोसले यांनी सत्तार यांच्या दर्शन घेण्यावर आक्षेप घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com